आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मजुरी मिळवण्यासाठी ट्रान्सफॉर्मरवर शोले स्टाइल आंदोलन, वीजेच्या तारा पकडण्याचा प्रयत्न करत

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बागपत - उत्तर प्रदेशातील बागपत जिल्ह्याच्या तहसील कार्यालयात शनिवारी एकच गोंधळ झाला. मजुरीचे पैसे न मिळाल्याने एक व्यक्तीने लाईटच्या खांबावर चढून आंदोलन केले. त्याला पाहुन लोकांची गर्दी जमली. बऱ्याच प्रयत्नानंतर त्याला पोलिसांनी खाली उतरवले.

 

गर्दी जमली 

हा व्यक्ती बिहारच्या दरभंगा येथील रहिवासी आहे. त्याठिकाणी तो मजुरी करुन आयुष्य जगतो. त्याच्या मालकाने अनेक दिवसांपासून मजुरीचे पैसे दिले नाही. त्यामुळे मालकाच्या त्रासाला कंटाळून तो तहसील परिसरतील वीजेच्या तारांच्या ट्रान्सफॉर्मरवर चढला. त्या ट्रान्सफॉर्मरवर चढताना वीजेचा पुरवठा सुरू होता. त्यामुळे अपघात घडण्याची शक्यता होती. त्याने अनेकदा विद्युत तारांना पकडण्याचा प्रयत्न केला, पण वीजेचा पुरवठा बंद केला त्यामुळे त्याला झटका लागला नाही. ट्रान्सफॉर्मरवर चढत असताना लोकांची गर्दी जमा झाली. लोकांनी त्याला समजावून सांगण्याचा प्रयत्न केला पण तो  ऐकायला तयार नव्हता. बऱ्याच प्रयत्नानंतर पोलिसांनी त्याला खाली उतरवले. त्याच्या घरची आर्थिक परिस्थिती अत्यंत बेताची असल्यामुळे त्याने हे टोकाचे पाऊल उचलल्याचे सांगितले जात आहे.

 

बातम्या आणखी आहेत...