आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Video: स्कूटरने उडवल्याने रस्त्यावर जाऊन पडला, नंतर अंगावरून ट्रक गेला तरी बालंबाल बचावला

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

व्हिडिओ डेस्क - रस्त्यावर गाडी चालवताना बेजबाबदारपणामुळे आतापर्यंत जगात अनेक अपघात घडलेले आपण पाहिले आहे. त्यामुळे अनेक लोकांना जीवही गमवावा लागला आहे. पण अशा घटनांमध्ये जीवन वाचायला हवा असेल तर तुमचे नशीब जोरावर असायला हवे. अशाच एका घटनेचा व्हडिओ. 


हा व्हिडिओ केरळच्या कोझिकोड गावातील आहे. त्यात रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या व्यक्तीचा थेट मृत्यूशी सामना झाला असे म्हणणे वावगे ठरणार नाही. त्यांना आधी स्कूटरने उडवले, नंतर ट्रकखाली आले पण तरीही ते वाचले. 


हा व्यक्ती रस्त्याच्या कडेला अगदी आरामध्ये स्कुटी लावून बोलत होता. तेव्हाच तीन तरुण आले आणि त्या व्यक्तीला काहीतरी बोलू लागले. अचानक एकाने चुकून एक्सलेरेटर दावले आणि त्यामुळे नियंत्रण सुटल्याने तो व्यक्ती स्कूटरसह हवेत उडाला आणि रस्त्यावर पडला. मागून एक ट्रक आला आणि त्याच्या अंगावरून गेला. नशीब बलवत्तर म्हणून हा व्यक्ती यातून बचावला. 


 

 

बातम्या आणखी आहेत...