आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सुनेच्या 'त्या' आरोपामुळे खचला वृद्ध सासरा; आधी खाल्ले विष, वाचला म्हणून कापला स्वत:चा प्रायव्हेट पार्ट

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अजमेर - सुनेने केलेल्या बलात्काराच्या आरोपामुळे व्यथित होऊन 54 वर्षीय सासऱ्याने आधी विष प्राशन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. त्यात तो वाचला, परंतु नंतर त्याने स्वत:च्या प्रायव्हेट पार्टवर ब्लेडने वार केले.

 

असे आहे प्रकरण...

बुधवारी गंभीर अवस्थेत त्यांना हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले, डॉक्टरांनी सासऱ्याची प्रकृती गंभीर असल्याचे सांगितले आहे. आपल्या सुनेकडून बलात्काराची केस दाखल झाल्यावर या बुजुर्ग सासू-सासऱ्यांनी विष प्राशन केले होते. यात सासूचा मृत्यू झाला. परंतु सासरा वाचला. तेव्हापासून वृद्ध तणावात होता.

 

सुनेने ठेवला गंभीर आरोप
- सूत्रांनुसार, सांपला परिसरातील एका गावातील बुजुर्गावर त्याच्या मधल्या मुलाच्या पत्नीने 22 ऑगस्ट रोजी बलात्काराचा आरोप केला.
- यात पती, सासरा, सासू आणि मोठ्या दिरावरही मारहाण, बलात्कारासहित इतर अनेक कलमांमध्ये गुन्हा दाखल केला होता. सासूने आत्महत्या केल्यानंतरही सुनेने कुटुंबीयांवर गुन्हा दाखल केला होता.

 

12 वर्षांपासून कॅन्सरशी झुंजत आहे सासरा
- सुनेने ज्यांच्यावर बलात्काराचा आरोप केला, तो सासरा गावात किराणा दुकान चालवतो. 12 वर्षांपासून त्यांना कॅन्सर असल्याचे सांगितले जाते.
- दीर्घ काळापासून रोहतक पीजीआयमध्ये त्यांच्यावर उपचार सुरू होते. त्यांची दोन्ही मुले रोहतकमध्ये ऑटो चालकाचे काम करतात.
- या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. पोलिस आता प्रकरणाचा नव्याने तपास करणार आहेत.

 

पुढच्या स्लाइडवर पाहा, वृद्ध सासऱ्याचा फोटो...  

 

बातम्या आणखी आहेत...