आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दफन करण्याच्या काही क्षणाआधी जिवंत झाला तरूण, हॉस्पीटलने केले होते मृत घोषित

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

लखनऊ(उत्तरप्रदेश)- येथील एका तरुणाला कब्रस्तानमध्ये दफन करण्याची पूर्ण तयारी झाली होती. कब्र खोदून मृतदेहाला त्यात ठेवले जाणार, तेव्हा कुटुंबातील लोकांना त्याच्या अंगात हालचाल झाल्याचे दिसले. त्यानंतर त्याला तत्काळ रुग्णालयात नेले, तिथे डॉक्टरांनी त्याला जिवंत असल्याचे सांगितले.


काय आहे प्रकरण ?
20 वर्षीय मोहम्मद फुरकान 21 जूनला एका अपघाता जखमी झाला होता. त्याला एका खासगी रूग्णालयात दाखल केले होते. सोमवारी डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. पण तो जिवंत असल्याचे कळाल्यावर त्याचे कुटुंबीय खूप आंनदी आहेत.


त्याचा मोठा भाऊ इरफानने सांगितले की, भावाच्या उपचारासाठी त्या रुग्णालयाने आतापर्यंत 7 लाख रूपये घेतले आहेत. जेव्हा आम्ही त्यांना आमच्याकडे आता पैसे नसल्याचे सांगितले, तेव्हा त्यांनी फुरकानला मृत घोषित केले. पण आता त्याला आम्ही राम मनोहर लोहिया रुग्णालयात दाखल केले आहे, सध्या तो व्हेंडिलेटरवर आहे.
 

फुरकानचा उपचार करणाऱ्या डॉक्टरांचे म्हणने आहे की, त्याची प्रकृती गंभीर आहे, पण तो ब्रेन डेड नाहीये. त्याची नाडी, ब्लड प्रेशर आणि मेंदू काम करत आहे.लखनऊचे मुख्य आरोग्य अधिकारी नरेंद्र अग्रवाल म्हमाले की, "आम्हाला या घटनेची माहिती आहे आणि यावर चौकशी करण्याचे आदेश आम्ही दिले आहेत."