आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नागपूर : कोराडीतील नवरात्रीच्या जत्रेत सर्कसमधील एका कर्मचाऱ्याने झाडाला लटकून घेतली फाशी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नागपूर - येथील कोराडी परिसरात नवरात्रोत्सवानिमित्त भरणाऱ्या जत्रेत एका व्यक्तीने झाडाला फाशी घेतल्याची घटना समोर आली आहे. मृत व्यक्ती जत्रेमध्ये लागणाऱ्या सर्कसीमध्ये काम करत होता अशी माहिती मिळाली आहे. नंदू कहारे असे त्याचे नाव आहे. 

 

नागपूरच्या कोराडी येथे जगदंबा देवीचे जागृत मंदिर आहे. त्याठिकाणी नवरात्रोत्सवामित्त 9 दिवस जत्रा भरत असते. याठिकाणी  भाविकांची गर्दी होत असलेल्याने येथील जत्रेला मोठे स्वरुप असते. या जत्रेमध्ये सर्कसीत काम करणाऱ्या नंदू कहारे याने आत्महत्या केल्याचे समोर आले आहे. याच परिसरातील एका झाडावर त्याला मृतदेह लटकलेल्या अवस्थेत आढळला आहे. पोलिस या प्रकरणी तपास करत आहेत. 

 

बातम्या आणखी आहेत...