आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रोबोटने फुप्फुस निकामी सांगताच रुग्णाचा मृत्यू

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सॅन फ्रान्सिस्को  - अमेरिकेतील सॅन फ्रान्सिस्कोच्या अल्मेडामध्ये एका ७८ वर्षीय व्यक्तीचा यंत्रमानव डॉक्टरमुळे मृत्यू झाला. फुप्फुस आजाराने पीडित अर्नेस्ट क्वाइंटानाचा मृत्यू मंगळवारी किजर मेडिकल सेंटरमध्ये झाला होता. त्यांना श्वास घ्यायला त्रास होत होता. त्यामुळे कुटुंबातील लोक त्यांना रुग्णवाहिकेने रुग्णालयात घेऊन गेले होते.  


तेथे आयसीयूमध्ये रोबोट यंत्र क्वाइंटाना यांच्यासमोर बरळले. या व्यक्तीला श्वास घेता येऊ शकत नाही. त्यांचे फुप्फुस निकामी झाले आहे. हे दोन दिवसांपेक्षा जास्त काळ जिवंत राहू शकत नाहीत, असे यंत्राने सांगितले. त्यामुळेच माझ्या वडिलांचा मृत्यू झाला, असा आरोप क्वाइंटाना यांची मुलगी कॅथरिन क्वाइंटाना यांनी केला आहे. डॉक्टरांनी रोबोटद्वारे निदानाबद्दलची माहिती देणे अयोग्य आहे, असे त्यांचे म्हणणे आहे.  


त्यांना फुप्फुस योग्य प्रकारे कार्य करणार नाही याची माहिती अशा स्थितीत देण्यात आली. तुम्ही अशा स्थितीत सामान्य माहिती दिली तर समजू शकते, परंतु एखादी गोष्ट ऐकून धक्का बसेल, असे बोलणे चुकीचे ठरते. हे काम डॉक्टरांनी स्वत: विशिष्ट पद्धतीने सांगितले पाहिजे. त्यातही रुग्णाला थेट न सांगता त्यांच्या नातेवाइकांना ही माहिती देणे संयुक्तिक ठरते. परंतु काहीही विधिनिषेध न बाळगता यंत्राने आपले काम केले. त्याचा धक्का सहन न झाल्याने वडील दगावले, असा आरोप कॅथरिन यांनी स्थानिक टीव्ही वाहिनीशी बोलताना केला. 


रुग्णालयाचे वरिष्ठ उपाध्यक्ष मायकल गॅस्किल हामेस यांनी या घटनेबद्दल दु:ख व्यक्त केले आहे. ही असामान्य परिस्थिती आहे. रुग्णांच्या अपेक्षेप्रमाणे आमच्या रुग्णालयाच्या अधिकाऱ्यांनी काम केलेले नाही, असे त्यांनी सांगितले. दुसरीकडे टेलिमेडिसिनच्या वापराचेही रुग्णालयाने समर्थन केले. टेली कन्सल्टेशनच्या वेळी रोबोटसोबत परिचारिका किंवा डॉक्टरही रुग्णासोबत असतात, असे रुग्णालय व्यवस्थापनाचे म्हणणे आहे.  


डॉक्टरांऐवजी अचानक रोबोट आला होता  
रोबोट डॉक्टरशी संभाषण करताना रुग्णासोबत त्यांची ३३ वर्षीय नात अन्नालिसिया विल्हार्म होत्या. तेव्हा परिचारिका त्यांच्याजवळ आल्या व डॉक्टर राउंडला येत आहेत असे सांगितले. परंतु अचानक रोबोट आला व त्याच्या व्हिडिआे स्क्रीनवर डॉक्टरांनी रुग्णाला निदानात्मक माहिती देण्यास सुरुवात केली. विल्हार्म म्हणाल्या, व्हिडिआेवरून डॉक्टरांनी सांगितलेल्या माहितीमुळे आम्हाला धक्का बसला होता. युरोपात अनेक रुग्णालयांतून टेलिमेडिसिन्या माध्यमातून उपचार केला जातो. तंत्रज्ञानाच्या वापराकडे वैद्यकीय क्षेत्रात क्रांतिकारक बदल म्हणून पाहिले जाते. मात्र या घटनेमुळे अमेरिकेत रोबोट यंत्राद्वारे टेलिकन्सल्टवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत. 

बातम्या आणखी आहेत...