आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नशेखोरीने सर्वकाही लुटले, घर विकले, पत्नी-मुलेही सोडून गेली, मृत्यूच्या तोंडी असताना मित्रही पळाले

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

लुधियाना - मित्रांबरोबर चित्रपट पाहण्यासाठी जात असल्याचे सांगून घरातून गेलेल्या तरुणाचा ड्रग्ज ओव्हरडोसमुळे मृत्यू झाला. मृताचे दोन मित्र त्याला हॉस्पिटलच्या इमर्जन्सीमध्ये सोडून पळून गेले. त्याठिकाणच्या स्टाफला त्याच्या खिशातून सिरींज सापडले. हॉस्पिटल प्रशासनाने अनाथ समजून मृतदेह रुग्णालयात शवागारात ठेण्यासाठी पाठवला. दुपारनंतर त्याची ओळख पटली. मृताचे नाव राहुल कुमार होते. त्याची आई सुदेश रानीने त्याची ओळख पटवली. काही वर्षांपूर्वी राहुलचे कुटुंब अत्यंत धनाढ्य असे होते. पण एकुलता एक असलेला मुलगा वाईट मार्गाला लागला. वडिलांच्या मृत्यूनंतर ड्रग्ज घेण्याचे प्रमाण वाढले. त्यासाठी घर, कार सर्व मालमत्ता विकल्या. पत्नीने घटस्फोट दिला आणि मुलाला घेऊन निघून गेली. 


चित्रपट पाहायला चालल्याचे सांगून घरातून गेला 
राहुलच्या ईने सांगितले की, राहुल कपड्यांच्या शोरूममध्ये काम करत होता. अनेक दिवसांपासून त्याला ड्रग्जचे व्यसन होते. पण गेल्या वर्षभरात त्याने फार कमी केले होते. गुरुवारी त्याने सुट्टी घेतली होती. सकाळी दहाच्या सुमारास आईकडून 100 रुपये घेतले आणि मित्रांबरोबर चित्रपट पाहायला चालल्याचे तो म्हणाला. दुपारी त्याच्या मित्रांनी फोन करून त्याची तब्येत खराब झाल्याचे सांगितले. आई हॉस्पिटलमध्ये पोहोचली तर त्याचा मृत्यू झाला होता. 
 

आईला म्हणाला होता, जुने दिवस परत येतील 
राहुलचे वडील ओमप्रकाश यांचे 2012 मध्ये निधन झाले होते. राहुल कुटुंबात एकुलता एक होता. त्याची एक बहिण आहे. तिचे लग्न झालेले आहे. राहुल कपड्याच्या शोरूममध्ये काम करून घर चालवत होता. 29 जुलैला राहुलचा वाढदिवस होता. त्यादिवशी तो बराच वेळ आईबरोबर जुन्या दिवसांबाबत चर्चा करत होता. तो म्हणाला, आता सर्व व्यसन सोडून मेहनतीने काम करणार आहे. लवकर जुने दिवस परत येतील असे तो आईला म्हणाला होता. 

बातम्या आणखी आहेत...