आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वाकाजवळ अपघातात एक जण जागीच ठार, ग्रामस्थांनी ३ रास्ता रोको...

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

 नांदेड- नांदेड-हैदराबाद मार्गावरील वाका पाटीजवळ सोमवारी सकाळी दहा वाजताच्या सुमाराला एका अज्ञात कंटेनरने मोटारसायकलला (एमएच २६ २५१९) जोरदार धडक दिल्यामुळे एक जण जागीच ठार झाला तर एक जण जखमी झाला. अपघातानंतर गावकऱ्यांनी हा मार्ग रोखून धरला.  तीन तासाहून अधिक काळ या मार्गावरील वाहतूक ठप्प झाली.  


वाका येथील विश्वनाथ कवळे (४२) आणि माधव गुंठे हे दोघे जण सकाळी नांदेडकडे येत असताना त्यांच्या दुचाकीला कंटेनरने जोरदार धडक दिली. या अपघातात विश्वनाथ कवळे यांचा जागीच मृत्यू झाला तर माधव गुंठे हे गंभीर जखमी झाले. अपघातानंतर कंटेनर चालक वाहनासह फरार झाला. वाका हे गाव नांदेड-हैदराबाद मार्गावर असून या मार्गावर दिवसरात्र वाहतूक सुरू असते. वाका पाटीजवळ गतिरोधक नसल्याने वाहने सुसाट वेगात असतात. गेल्या सहा महिन्यांत याच ठिकाणी जवळपास दहा अपघात झाले असून त्यात सात जणांंना प्राण गमवावे लागले. या ठिकाणी गतिरोधक बसवावा अशी गावकऱ्यांची मागणी होती.

बातम्या आणखी आहेत...