आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भरधाव ट्रेलरच्या धडकेत दुचाकीस्वार जागीच ठार

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बुलडाणा- भरधाव जाणाऱ्या ट्रेलरने समोरून येणाऱ्या दुचाकीस जबर धडक दिल्याने झालेल्या अपघातात दुचाकीस्वार जागीच ठार झाला तर अन्य एक जण जखमी झाल्याची घटना ६ डिसेंबर रोजी सकाळी सात वाजेच्या सुमारास मोताळा बुलडाणा मार्गावरील राजूर घाटात घडली. राहुल छगन राठोड वय २१ रा खडकी असे मृतकाचे नाव आहे. 


मोताळा तालुक्यातील खडकी येथील रहिवासी राहुल राठोड हा युवक आपल्या मित्रासह सकाळी दुचाकीने बुलडाण्याकडे निघाला होता. खडकी नजीक असणाऱ्या वळणार बुलडाणा येथून मलकापूरकडे जाणाऱ्या ट्रेलर ट्रेलरची व मोटार सायकलची समोरासमोर जबर धडक झाली. या अपघातात राहुल राठोडच्या डोक्यास जबर मार लागला. अपघात घडताच नागरिकांनी घटनास्थळी धाव घेवून त्याला उपचारार्थ येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल केले. यावेळी वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणी करून त्यास मृत घोषित केले. या प्रकरणी बोराखेडी पोलिस ठाण्यात ट्रेलर चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

बातम्या आणखी आहेत...