आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लग्नात नाचत असताना घोड्याने लाथ मारल्याने एकाचा मृत्यू, माढ्यात घडला धक्कादायक प्रकार

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर- अनेक ठिकाणी लग्नात घोड्याला नाचवण्याची प्रथा आहे. पण या प्रथेमुळे माढा तालुक्यातील अंजनगावच्या एका व्यक्तीचा हकनाक जीव गेल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. त्यामुळे लग्न सभारंभात घोडा नाचवण्याची प्रथा बंद करण्यात यावी, अशी मागणी सुरू झाली आहे.


सोलापूरच्या माढा तालुक्यातील अंजनगाव गावातील किसन वाघमोडे यांच्या घरी लग्न होते. लग्नातील धार्मिक विधीसाठी नवरदेवाची मिरवणूक घोड्यावरुन मंदीराकडे रवाणा झाली. त्यावेळी गावकऱ्यांनी नवरदेवाचा घोडा बँडच्या तालावर नाचवण्यास सुरुवात केली. नाचत असताना अचानक घोडा बिथरला आणि त्याने पाठीमागे उभ्या असलेल्या अनिल गायकवाड यांना जोरात लाथ मारली.


घोड्याने मारलेल्या लाथेमुळे अनिल जमिनीवर कोसळले. त्यानंतर अनिल यांना उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. पण उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. अनिल गायकवाड हे गेल्या अनेक वर्षांपासून गावात राहतात. गावात लग्नकार्य असल्याने ते नवरदेवासोबत गेले होते. घोडा नाचवताना ते पाठीमागे उभे होते. पण घोड्याने लाथ मारल्यामुळे त्यांचा हाकनाक जीव गेलाय.
 

बातम्या आणखी आहेत...