Home | National | Other State | Man died on railway track by train while drinking alcohol

जौनपूरमध्ये दारूच्या नशेत ट्रक ड्रायव्हर जाऊन बसला रेल्वे पटरीवर, या दरम्यान ट्रेन आली आणि झाले असे

दिव्य मराठी वेब टीम | Update - May 13, 2019, 02:05 PM IST

रात्री 10 वाजता तो दारू पिण्यासाठी रेल्वे पटरीवर जाऊन बसला

  • Man  died on railway track by train while drinking alcohol

    जौनपूर(उत्तर प्रदेश)- येथील चौकिया धामजवळील जौनपूर-औढिहार रेल्वे क्रासिंगवर रविवारी रात्री 10 वाजता ट्रेनच्या धडकेत तरूणाचा मृत्यू झाला आहे. तरूण दारूच्या नशेत लाइन बाजार परिसरातील खलसहा रेल्वे क्रासिंगच्या पटरीवर बसला. घटनेची सुचना मिळताच पोलिसांनी घटनास्थळावरून तरूणाचा मृतदेह ताब्यात घेतला आहे. मृत तरूणाचे नाव संजय यादव राहणार इटौरी बाजार गाव सोनीपूर ता. सरायख्‍वाजा अशी झाली आहे. संजय यादव हा व्यवसायाने ट्रक ड्रायव्हर आहे.


    लाइन बाजार परिसरातील चौकीपूर गावमध्ये राजेन्द्र यादव यांच्या घरी त्याचे सासर आहे. पत्नीचे दोन वर्षांपूर्वी निधन झाले आहे. त्याच्या दोन मुलांचे पालन पोषण सासरीच होत होते. संजयदेखील मुलांसाठी आपल्या सासरीच राहत होता. रविवारी रात्री 10 वाजता तो दारू पिण्यासाठी रेल्वे पटरीवर जाऊन बसला. त्यानंतर रात्री ट्रेनच्या धडकेने त्याचा मृत्यू झाला.

Trending