आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हनिमून रूममध्ये गेली तरुणी आणि किंचाळत बाहेर आली, 12 तासांच आयुष्य झाले उध्वस्त

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
फाइल फोटो. - Divya Marathi
फाइल फोटो.

वेस्ट न्यूयॉर्कमध्ये लग्नाच्या 12 तासांमध्ये एका नवरीचे आयुष्य उध्वस्त झाले. हनिमूनसाठी रूममध्ये प्रवेश करताच ती किंचाळत बाहेर पळत आली आणि लोकांकडे मदत मागू लागली. सोशल मीडियावर तिने तिचे दुःख व्यक्त केले आहे. तरुणीने लिहिले की, आता ती कशी जगणार हेच तिला कळत नाही. 

 

लग्नानंतर काही वेळातच नवरदेवाचा मृत्यू 
या तरुणीचे लग्न काही दिवसांपूर्वी झाले होते. या लग्नसोहळ्यात जवळपास 80 पाहुण्यांची उपस्थिती होती. दोघांनी लग्नात एकमेकांबरोबर आयुष्य घालवण्याच्या शपथा घेतल्या. लग्नाची पार्टी सुरुच होती. नवरदेव डॅनी त्याच्या खोलीत गेला. काही वेळाने नवरी त्याच्या मागे खोलीत गेली तेव्हा तिने पाहिले तर डॅनीचा मृत्यू झालेला होता. हे पाहून तिला धक्काच बसला आणि ती किंचाळत बाहेर पळाली. 


सात वर्षांपासून होते रिलेशनशिपमध्ये 
डॅनी आणि क्लेयर हे सात वर्षांपासून रिपेशनशिपमध्ये होते. डॅनीचे आधी लग्न झालेले होते आणि त्याला एक मुलगाही होता. मात्र डॅनीला आधीचा काहीही आजार नव्हता. डॅनी क्लेयरच्या दोन तास आधी खोलीत गेला होता. ती जेव्हा खोलीत पोहोचली तेव्हा डॅनीने काहीही हालचाल केली नाही. त्यानंतर तिने पाहिले तर त्याचे निधन झालेले होते. 

 

 

बातम्या आणखी आहेत...