आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

इअर फोन लावून मोबाइल गेम खेळत होता मजूर, अचानक बसला वीजेचा धक्का आणि झाला मृत्यू 

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

चोनबुरी - थायलंडच्या चोनबुरी प्रांतात राहणाऱ्या एका व्यकतीचा जीव त्याच्याच फोनमुळे गेला. हा व्यक्ती रात्रीच्या वेळी फोन चार्जिंगला लावून लोटलेला होता. तो फोनला इअरफोन लावून गेम खेळत होता. दुसऱ्या दिवशी जेव्हा घराचा मालक याठिकाणी पोहोचला तेव्हा त्याला हा व्यक्ती मृतावस्थेत आढळला. त्याने लगेचच चोनबुरी पोलिसांनी याची माहिती दिली. त्यात आश्चर्यकारक बाब समोर आली. 


पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये समोर आले की, 24 वर्षांच्या क्रिट्सडा सुपोलचा मृत्यू करंट लागल्याने झाला होता. सुपोल त्याचठिकाणी राहून एका फॅक्टरीत काम करत होता. रात्री तो फोन चार्जिंगला लावून झोपला होता आणि त्याच्या कानात इअरफोन होते. 


पोलिसांचे म्हणणे आहे की, सुपोल फोनवर गेम खेळत होता किंवा कोणाशी तरी बोलत होता. त्याच्या इअरफोनचा माइक त्याच्या ओठांवर होता. त्याचवेळी त्याला वीजेचा जोरदार झटका लागला. इअरफोनमुळे त्याच्या कानाचा काही भागही जळाला होता. 


पुढे वाचा, या चुकीमुळे घेतला जीव?

बातम्या आणखी आहेत...