आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पत्नी झोपेत असताना पतीने केले असे घाणेरडे काम, उद्ध्वस्त झाले आयुष्य

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

यूएई - संयुक्त अरब अमिरातमधील फुजैराह येथे एका पतीने आपल्या पत्नीच्या मोबाइलशी अशी छेडछाड केली की, त्याला 1 महिन्याचा तुरुंगवास आणि सोबतच 1 हजार दिऱ्हमचा दंड लावण्यात आला आहे. एवढेच नाही, आता त्याच्या पत्नीनेही त्याच्यापासून फारकत घेण्याचा निर्णय घेतला आहे. 


पत्नीच्या मोबाइलमधून चोरले तिच्या मैत्रिणीचे प्रायव्हेट फोटो
ही घटना यूएईच्या फुजैराह शहरातील आहे. येथे एका पतीने आपल्या पत्नीच्या मोबाइल फोनमधून तिच्या मैत्रिणीचे खासगी फोटो चोरले, जेव्हा ती झोपलेली होती. ही बाब पत्नीच्या मैत्रिणीला कळताच तिने पोलिसांत तक्रार दाखल केली.


मोबाइल पाहून पोलिसही हैराण
पोलिसांनी या व्यक्तीला अटक करून चौकशी केली तेव्हा त्याने कबूल केले. त्याने पोलिसांना सांगितले की, त्याची पत्नी रात्री झोपेत होते तेव्हा त्याने तिच्या मैत्रिणीचे प्रायव्हेट फोटोज आपल्या मोबाइलमध्ये ट्रान्सफर केले. पोलिसांनी जेव्हा मोबाइल चेक केला, तेव्हा त्यांनाही धक्का बसला, कारण त्यात एक-दोन नव्हे तर अनेक धक्कादायक फोटोज होते.

 

दंडासह 1 महिन्याचा तुरुंगवास
याप्रकरणी या व्यक्तीला एका महिन्याच्या तुरुंगवासाची शिक्षा झाली आहे. सोबत 1 हजार दिऱ्हमचा दंडही ठोठावण्यात आला आहे. दुसरीकडे पत्नीनेही कोर्टात घटस्फोटासाठी धाव घेतली आहे. तथापि, सासू-सासऱ्यांनी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला, परंतु तिने माघार घेतली नाही. पती-पत्नीचे नाते विश्वासाचे असते, परंतु त्यात थोडाही संशय निर्माण झाला, तर संसार उद्ध्वस्त व्हायला वेळ लागत नाही. 

 

बातम्या आणखी आहेत...