आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शेणातून सुचली कल्पना त्यातून उभा केला व्यवसाय, आता महिन्याला करतात 4 लाखांची कमाई

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - वेगवेगळ्या प्रकारच्या आयडिया या अनेक लोकांकडे असतात पण त्यांचा व्यवसायात वापर करण्याची हिम्मत काही मोजके लोक करतात. तर काही लोक असेही असतात जे त्यांच्या अनोख्या कल्पनेच्या माध्यमातून चांगला व्यवसाय सुरू करतात. असेच एक व्यक्ती म्हणजे गुरशरण सिंग. त्यांनी वेगळा विचार करत व्यवसाय सुरू केला आणि आज ते महिन्याला 4 लाखांची कमाई करत आहेत. 


पंजाबच्या गुरुशरण यांनी सांगितले की, अॅग्रीकल्चरमध्ये मार्केटींग मॅनेजमेंट केल्यानंतर ते एका ठिकाणी नोकरी करत होते. पण त्यांना सुरुवातीपासूनच काहीतरी व्यवसाय करण्याची इच्छा होती. मात्र त्यासाठी त्यांना चांगली कल्पना सूचत नव्हती. त्याचवेळी त्यांच्या लक्षात आले की, सरकार शेतकऱ्यांकडून सेंद्रिय खतांचा वापर वाढवण्यासाठी आणि शेतजमीन नापीक होण्यापासून वाचवण्याचा प्रयत्न करत आहेत. खतांमध्ये नायट्रोजनचे प्रमाण अधिक असते. शेणातही नायट्रोजन आढळते. यातूनच त्यांना बिझनेस आयडिया मिळाली आणि शुभकरमन वर्मीकम्पोस्ट (गांडूळखत) ची सुरुवात झाली. आज त्यांच्या कंपनीचा वार्षिक टर्नओव्हर 50 लाख रुपये आहे. 

 
शेणापासून बनते वर्मीकम्पोस्ट (गांडूळखत)
गांडूळखत तयार करण्यासाठी शेणाचा अधिक वापर केला जातो. त्याशिवाय झाडची गळून पडलेली, सडलेली पाने असे सर्व शेणात मिक्स केल्यानंतर त्यात गांडूळ टाकले जातात. त्यानंतर त्यापासून गांडूळखत मिळते. गुरुशरण यांच्याकडे फार जनावरे नसल्याने ते शेजारच्या गावांमधूनही शेणाची खरेदी करतात. ते सांगतात की, 35 किलो शेणाची एक ट्रॉली खरेदी करण्यासाठी सुमारे 1500 रुपयांचा खर्च येतो. शेणात 40 ते 50 टक्के पाण्याचे प्रमाण असते. त्यातून 17-18 किलो शेण मिळते. एक ट्रॉली तयार करण्यासाठी 1200 ते 1500 रुपये खर्च येतो आणि कंपोस्ट 70 ते 90 दिवसांत तयार होते. 

 
 

बातम्या आणखी आहेत...