आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

किचनमधून रांगत बाहेर आली महिला, तिच्या पोटात चाकू भोसकल्याने रक्त बंबाळ झाली होती, ते पाहून कुटुंबीयांना बसला धक्का

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

दीनानगर(पंजाब)- घरात घुसून एका व्यक्तीने महिलेच्या पोटात चाकू भोसकला. महिलेचा आवाज ऐकून तिला वाचवण्यासाठी आलेल्या सासऱ्यावरही आरोपीने हल्ला केला. घटना घडल्यानंतर आरोपीने तेथून पळ काढला. गंभीर जखमी झालेल्या ज्योती देवी यांना जालंधरच्या कॅपिटल हॉस्पीटलमध्ये दाखल करण्यात आले.


आरोपी हरप्रीत सिंग हॅप्पी सोमवारी रात्री अंदाजे 8.40 वाजता तो न्यामता गावात आला आणि एका घरात घुसून विवाहीत महिलेसोबत अतिप्रसंग करू लागला. त्याने आपल्यासोबत चाकू आणला होता. महिलेने त्याला विरोध केल्यावर त्याने महिलेच्या पोटात चाकू भोसकला आणि पळ काढला. घटनेच्या दोन तासानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन कारवाई सुरू केली.


सहा महिन्यांपूर्वी झाला होता वाद
आरोपी हरप्रीत महिलेच्या मुलाच्या शाळेत बस ड्रायव्हरचे काम करतो. त्याने ज्योतीच्या मुलाकडून तिचा मोबाईल नंबर मागितला आणि तिला कॉल करून त्रास देत होता. यावरून त्यांच्यात वाद झाला होता पण हा वाद पंचायत समोर मिटवण्यात आला होता. पण याचाच राग मनात धरून त्याने हा हल्ला केला.
 

बातम्या आणखी आहेत...