आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एका व्यक्तीने वर्षभरात 45000 वेळा केला पोलिसांना फोन, रोज 100 वेळा इमर्जन्सी क्रमांकावर करायचा कॉल, पण एकदाही केली नाही तक्रार

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

इस्तानबूल - तुर्कस्तानात 55 वर्षांच्या एका व्यक्तीने वर्षभरात पोलिसांना 45000 वेळा कॉल केला. हा व्यक्ती रोज 100 वेळा इमर्जन्सी नंबरवर कॉल करायचा. पण त्याने एकदाही तक्रार दाखल केली नाही. अखेर पोलिस स्टाफ त्याच्या या सवयीला कंटाळले आणि त्या व्यक्तीची तक्रार केली. प्रकरण कोर्टात पोहोचले. त्याने कोर्टात सांगितले की, दोन वर्षांपूर्वी त्याचा घटस्फोट झाला होता. त्याला एखटेपणा जाणवायला लागला, त्यामुळे दुःख वाटण्यासाठी तो फोन करत होता. कोर्टाने या तरुणाला पाच वर्षांची शिक्षा सुनावली आहे. 


रोज 100 वेळा पोलिसांना फोन 
- हे प्रकरण इस्तानबूलच्या बयरामपासा डिस्ट्रीक्टचे आहे. येथील सेरेफ कॅनने 15 मे 2017 ते 15 मे 2018 पर्यंत रोज दिवसभरातून 100 वेळा इमर्जन्सी नंबरवर फोन लावला. 
- इमर्जन्सी क्रमांकावर कोणीही फोन लावला की त्याच्याशी सेरेम बोलू लागायचा पण त्याने तक्रार केली नाही. हाच प्रकार रोज सुरू होता. 
- काही महिन्यांनी पोलिस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना राग अनावर झाला. त्यांनी सेरेमविरोधात तक्रार केली. 
- या प्रकरणाची चौकशी सुरू झाली तेव्हा समजले की, सेरेमने 115 इमर्जनसी क्रमांकावर फोन लावत स्टाफला त्रास दिला. तपासात त्याच्यावर अधिकाऱ्यांच्या कामावर परिणाम होईल असे कृत्य केल्याचा आरोप झाला. 


सेरेमने सांगितल्या वेदना 
- हे प्रकरण कोर्टात पोहोचले आणि सुनावणी सुरू झाली तेव्हा सेरेमने पोलिसांची माफी मागत फक्त एकटेपणा दूर करण्यासाठी तो फोन करत होता, हे स्पष्ट केले. 
- सेरेम म्हणाला की, दोन वर्षांपूर्वी त्याचा घटस्फोट झाला. त्यामुळे त्याला दारुचे व्यसन जडले. तो नेहमी नशेत असायचा. 
- सेरेम म्हणाला की, मी डीप्रेशनमध्ये हतो. एकटेपणा जाणवत होता. त्यामुळेच मी एकटेपणा दूर करण्यासाठी इमर्जन्सी नंबरवर फोन करत होतो. 
- सेरेमने कोर्टात चूकही मान्य केली. भविष्यात पुन्हा अशी चूक होणार नाही, असे तो म्हणाला. 

बातम्या आणखी आहेत...