आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Man Faces Two Year Prison Sentence For Opening Letter Addressed To His 10 Year Old Son

10 वर्षांच्या मुलाला आलेले पत्र त्याला न कळवता उघडले, वडिलांना होऊ शकते 2 वर्षांची कैद

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

माद्रिद - तरुण-तरुणी असो वा 10 वर्षांचा मुलगा, सर्वांची प्रायव्हेट लाइफ तितकीच महत्वाची असल्याचे स्पेनच्या एका कोर्टाने स्पष्ट केले. येथील न्यायालय एका बापाला 2 वर्षांची कैद सुनावणार अशी चर्चा सुरू आहे. सोबतच, 2.33 लाख रुपयांचा दंड देखील ठोठावला जाऊ शकतो. या आरोपी वडिलांची चूक एवढीच की त्यांनी आपल्या मुलाला आलेले पत्र उघडले होते. मुलाला आलेले पत्र त्याच मुलाचे वैयक्तिक पत्र होते. वडील असले तरीही त्यांना ते उघडण्याची परवानगी नव्हती. 10 वर्षांच्या मुलाला न सांगता त्याचे पत्र उघडून वडिलांनी त्याच्या खासगी आयुष्याचा भंग केला असे कोर्टात सांगण्यात आले आहे.


मावशीने पाठवले होते पत्र...
हे पत्र त्या मुलाला त्याच्या मावशीने पाठवले होते. वडिलांना ते उघडण्याचा अधिकार नव्हता. पत्रात मावशीने लिहिले होते, की 2012 मध्ये त्याच्या वडिलांनी आईचा छळ केला होता. सोबतच, मुलाला आपल्या वडिलांना कसे दोषी ठरवता येईल त्याचा तपशील पत्रात मांडण्यात आला होता. मात्र, कोर्टात आपला बचाव करताना वडिलांनी वेगळाच युक्तीवाद मांडला. मुलाची मावशी मुद्दाम त्याला आपल्याविरोधात भडकावत असल्याचे तो म्हणाला. 2012 मध्ये मुलाच्या आईने आपल्या पतीविरोधात कायदेशीर कारवाईसाठी अर्ज दाखल केला होता. तिने आपल्या पतीवर खासगी माहिती सार्वजनिक करण्याचे आरोप लावले होते.


वडिलांनी मुलाचे पत्र वाचल्याची माहिती समोर आल्यानंतर मावशीने आरोपीला 2 वर्षांची कैद आणि भरपाईची मागणी केली होती. यासोबत वकिलाची फी म्हणून अतिरिक्त दीड लाख रुपये देण्यात यावे असेही मावशीने खटल्यात म्हटले होते. आरोपीने सुरुवातीला आपला बचाव केला. परंतु, त्यानंतर चुकून पत्र आपणच उघडल्याची कबुली दिली. आपण मुलाचे वडील असल्याने त्याला आलेले पत्र उघडण्याचा अधिकार आहे असे त्यांनी कोर्टात ठणकावले. कोर्टाने दोन्ही पक्षांचे युक्तीवाद ऐकले असून त्यावर अंतिम निकाल येणार आहे.