Home | International | China | man fakes death to claim insurance leading to suicide of his wife in china

पतीच्या निधनाचे वृत्त ऐकूण तिने दोन्ही मुलांना ठार मारून केली आत्महत्या, अन् तो जिवंत परतला! मग झाला धक्कादायक खुलासा

दिव्य मराठी वेब टीम | Update - Oct 19, 2018, 12:06 AM IST

तो स्वतःहून पोलिसांना शरण गेला आणि आपल्या कृत्याची संपूर्ण हकिगत मांडली.

 • man fakes death to claim insurance leading to suicide of his wife in china

  बीजिंग - चीनच्या हुनान प्रांतात एका नदीकाठी तीन आठवड्यांपूर्वी एक अपघातग्रस्त कार सापडली. कारची अवस्था इतकी वाइट होती की त्यातील व्यक्ती जिवंत असेल याची शक्यता वाटत नव्हती. ती कार याच ठिकाणी राहणाऱ्या एका 34 वर्षीय पुरुषाची होती. पोलिसांनी प्रथमदृष्ट्या मृत्यूची घटना नमूद केली. तसेच हे वृत्त त्याच्या पत्नीला दिले. प्रचंड मानसिक धक्क्यात असलेल्या पत्नीने या घटनेच्या तीन आठवड्यानंतर आपल्या दोन्ही चिमुकल्या मुला-मुलींना पाण्यात बुडवून ठार मारले आणि आत्महत्या केली. परंतु, यानंतर जे घडले त्याचा कुणी विचारही केला नव्हता. ज्या पतीच्या निधनाच्या दुखात तिने मुलांना मारून आत्महत्या केली तो जिवंत परतला. तसेच त्याने आपल्या हत्येचा बनाव केला होता अशी कबुली दिली.


  यामुळे केला होता हत्येचा बनाव
  - पत्नीसह 4 वर्षांचा मुलगा आणि अवघ्या 3 वर्षांच्या मुलीचा मृत्यू झाल्यानंतर मृत समजल्या जाणारा पती अचानक जिवंत परतला. हा धक्कादायक क्षण पाहून सर्वच शेजारी हैराण झाले. काय करावे त्यांना काहीच सूचत नव्हते. यानंतर तो स्वतःहून पोलिसांना शरण गेला आणि आपल्या कृत्याची संपूर्ण हकिगत मांडली.
  - चिनी माध्यमांच्या वृत्तानुसार, त्याने काही दिवसांपूर्वीच 10 लाख रुपयांचे कर्ज घेतले होते. सोबतच, एक कोटी रुपयांचा टर्म इंश्युरन्स काढला होता. कर्ज फेडू शकत नसल्याने त्याने आपल्याच मृत्यूचा ढोंग रचला. कारचे अपघात करून तो 3 आठवडे गायब होता. कुटुंबियांना जीवन विम्याचे चेक मिळेल याची तो वाट पाहत होता. त्यातच अचानक आपल्या पत्नी, मुलगा आणि मुलीचे वृत्त त्याला मिळाले.
  - 10 लाखांचे कर्ज फेडण्यासाठी त्याने 1 कोटींचा विमा मिळवण्याच्या नादात हा संपूर्ण कट रचला होता. परंतु, या गोष्टीची कल्पना देखील पत्नीला दिली नाही. आपला पती नेहमीसाठी गेलाय या दुखात तिने मुला-मुलींना ठार मारले आणि या जगाचा निरोप घेतला. आपल्यासारखा राक्षस या जगात नसेल असे म्हणत तो पोलिसांना शरण गेला.


  सोशल मीडियावर संताप
  चीनचे सर्वात लोकप्रीय सोशल मीडिया वीबोवर ही स्टोरी प्रचंड व्हायरल होत आहे. लोक या माणसाचे कृत्य शेअर करून त्यावर आपला रोष व्यक्त करत आहेत. वीबो आणि ट्विटर या दोन्ही सोशल मीडियावर लोकांनी संताप व्यक्त केला. त्यांच्या प्रतिक्रियांसह #ManFakesDeathLeadingtoWifesDeath हा हॅशटॅग सध्या ट्रेंड करत आहे.

 • man fakes death to claim insurance leading to suicide of his wife in china
 • man fakes death to claim insurance leading to suicide of his wife in china

Trending