आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रयोगासाठी त्याने छातीवर लावला ब्लुटूथ कंपास, पण त्याचा परिणाम असा होईल याची त्याला जाणीवच नव्हती

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

लंडन - इंग्लंडसह संपूर्ण युरोपमध्ये सध्या एक नवा ट्रेंड समोर येत आहे. त्यात लोक त्यांच्या बॉडीमध्ये इलेक्ट्रॉनिक चीप लावून विविध प्रयोग करत आहेत. शरीर आणि मेंदूने अधिक चांगल्या पद्धतीने काम करावे या उद्देशाने ते असे करत आहेत. असाच प्रयोग करत एका व्यक्तीने छातीवर ब्लूटूथ कंपास (दिशा सूचक यंत्र) लावले. त्यामुळे त्या व्यक्तीचे शरीर एका नेव्हीगेशन सिस्टीमसारखे काम करत आहे. 


उत्तरेला वळताच चीप करते व्हायब्रेट 
- स्वतःच्या शरीरारवर प्रयोग करणाऱ्या या व्यक्तीचे नाव लिव्यू बाबित्ज (38) आहे. त्याने डाव्या बाजुला छातीवर ब्लूटूथ कंपासची चीप लावली आहे. बाबित्जचे म्हणणे आहे की, या चीपने त्याला एक नवा ह्युमन सेन्स दिला आहे. 
- ही इलेक्ट्रॉनिक चीप त्याच्या शरीराशी दोन टायटॅनियम बारद्वारे जोडलेली आहे. त्याच्या आतच कंपास चीप लावलेली आहे. त्याला कनेक्टिव्हिटीसाठी ब्लूटूथ कनेक्शन दिले आहे. 
- बाबित्ज उत्तर दिशेला वळताच ही चीप व्हायब्रेट करू लागते. त्याचे म्हणणे आहे की, अनेकदा त्याला असे वाटते की, त्याची बॉडी नेव्हीगेशन सिस्टीमसारखी काम करू लागली आहे. 

अंध लोकांचे जीवन बदलू शकते ही चीप 
- टेक्नॉलॉजीसाठी क्रेझी असलेल्या अशा लोकांना बायोहॅकर्स म्हटले जाते. जे स्वतःच्या शरीर आणि ब्रेनला अधिक चांगल्या पद्धतीने काम करण्यासाठी त्याला कम्प्युटरप्रमाणे हॅक करण्याचा प्रयत्न करतात. 
- नुकतेच बीबीसीने त्याच्या व्हिक्टोरिया डर्बीशायर प्रोग्राम अंतर्गत अशा लोकांचा शोध लावला आहे जे, त्यांच्या बॉडीमध्ये टेक्नॉलॉजीचा वापर करत आहेत. असे करताना ते त्यांचा DNA बदलण्याचा प्रयत्न करत आहेत. 
- इंटरव्ह्यूदरम्यान छातीवर कंपास चीप लावणाऱ्या बाबित्जने म्हटले की, तुम्ही रस्त्यावर चालताना सध्या नेव्हीगेशनसाठी तुम्हाला मोबाईल पाहत राहावा लागतो. पण कल्पना करा जर तुम्हाला याची गरजच पडली नाही तर. 
- पुढे तो म्हणाला, तुम्ही जगात ज्याप्रमाणे पक्षी उडतात त्याप्रमाणे फिरू शकता. पण जेव्हा तुम्ही कुठे आहात हे प्रत्येक क्षणी तुम्हाल कळेल, तेव्हाच हे शक्य होईल. हे तंत्रज्ञान अंध लोकांसाठी वरदान ठरू शकते. याच्या मदतीने ते कुठेही येऊजाऊ शकतात. 

बातम्या आणखी आहेत...