आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बंद खोलीत सापडले खारूताईचे पिलू, खूप शोधूनही सापडली नाही आई.. वाचा घरातील सदस्य बनण्याची इमोशनल स्टोरी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

वॉशिंग्टन - अमेरिकेच्या वॉशिंग्टनमध्ये राहणाऱ्या एका कपलने अनेक महिन्यांनी घरातील एक बंद खोली उघडली. त्याठिकाणी त्यांचा एक खारुताईचे पिलू दिसले. अगदी अंगठ्याएवढ्या आकाराचे असेल ते, जवळच त्याचे घरटेही त्या कपलने तज्ज्ञांनी मदत घेतली आणि त्या पिलाला आई भेटावी म्हणून त्या पिलाला परत घरट्यात ठेवले. पण त्याची आई कधीही परतली नाही. त्यानंतर या कपलने पिलाला पाळण्याचा निर्णय घेतला. 

 

स्वतः मानव समजते खारुताई 
- क्रिस्टीना आणि मायकलने या पिलाची काळजी घेण्यास सुरुवात केली. पण आईशिवाय त्याला जगवणे हे सर्वात मोठे आव्हान होते. तेव्हा मायकलने त्याला कृत्रिमरित्या पोषक तत्वे देण्यास सुरुवात केली. खारुताईचे हे पिलू अगदी अंगठ्याएवढ्या आकाराचे होते. म्हणून तिचे नाव थंबलिना ठेवले. 


खायला केली सुरुवात 
थंबलिना हळू हळू मोठी होऊ लागली. तिला घरात तयार केलेल्या वस्तू आवडू लागल्या. आता तिला दुधाऐवजी अन्न खाणे आवडत होते. पण साधारण खारुताईंप्रमाणे तिला उड्या मारणे, झाडावर चढणे आवडत नव्हते. 


स्वतःला समजू लागली मानव 
लहानपणापासूनच ही खारुताईने इतर खारुताईंबरोबर राहिली नाही. मानवाकडून तिचा सांभाळ करण्यात आला. त्यामुळे ती स्वतःला माणूस समजू लागली होती. थंबलिना चार पायांवर चालण्याऐवजी दोन पायांवर चालायची, धावण्याऐवजी ती मानवाप्रमाणे एक एक पाय उचलून चालायची. मायकल आणि क्रिस्टीनाने हे पाहिले तेव्हा त्यांनी तिला इतर खारुताईंबरोबर सोडले. पण ती त्यांना स्वतःसारखे समजत नव्हती. ती त्यांच्यात रमलीच नाही, आणि पळून घरी आली. 


मायकल आणि क्रिस्टिना बनले आई वडील 
सर्वात मजेशीर बाब म्हणजे थंबलिना एखाद्या लहान मुलाप्रमाणे त्या घरामध्ये राहत होती. ती मायकल आणि क्रिस्टीनाला मॉम डॅड समजते आणि त्यांच्याकडून लाड पुरवून घेते. 

बातम्या आणखी आहेत...