आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Lift मध्ये एकटी महिला पाहून प्रायव्हेट पार्ट दाखवायचा तरुण, असे पकडले माथेफिरूला

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

गुरुग्राम - शहर पोलिसांनी शुक्रवारी एका तरुणाला अटक केली, ज्याच्यावर आरोप आहे तो लिफ्टमध्ये महिलांना एकटे पाहून त्यांना प्रायव्हेट पार्ट दाखवायचा. मागच्या 3 दिवसांत आरोपीने 6 महिलांसोबत असे केले होते. शुक्रवारी एका पीडित महिलेच्या तक्रारीवरून पोलिसांनी त्याला अटक केली. आरोपी रवी कपूर (30 वर्षे) हा दिल्लीच्या ग्रेटर कैलाशचा रहिवासी आहे. त्याला गुरुग्रामच्या एका शॉपिंग कॉम्प्लेक्समधून अटक करण्यात आली आहे. 

 

चौकशीत आढळले की, आरोपी एक फायनान्स एक्झिक्युटिव्ह आहे. शनिवारी आरोपीला कोर्टापुढे हजर करण्यात आला, तेथून त्याला जामीन मिळाला आहे.

 

पोलिसांच्या मते, इमारतीच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्याचे फुटेज पाहिल्यावर कळले की, आरोपी रवी कपूर शुक्रवारी गुरुग्रामच्या सेक्टर 30 मधील शॉपिंग कॉम्प्लेक्स स्टार टॉवरच्या आसपास फिरत होता. त्याला अनेकदा इमारतीच्या लिफ्टमध्येही पाहण्यात आले. एका इंग्रजी दैनिकाच्या वृत्तानुसार, अटकेच्या 3 दिवसांपूर्वी पर्यंत तो अनेक महिलांना लिफ्टमध्ये एकटे गाठून प्रायव्हेट पार्ट दाखवत होता. परंतु कोणत्याही महिलेने याची तक्रार केली नव्हती.

 

शुक्रवारी एका महिला जी इमारतीतीलच एका एजन्सीत काम करते ती ऑफिसकडे लिफ्टमधून जात होती. यादरम्यान आरोपी आधीपासूनच लिफ्टमध्ये उपस्थित होता. महिलेला एकटे पाहून आरोपीने आपला प्रायव्हेट पार्ट दाखवणे सुरू केले. यावर महिला गप्प राहिली, परंतु लिफ्टचा दरवाजा उघडताच तिने आरडाओरड करून लोकांना गोळा केले. मग गार्ड्सनी आरोपीला पकडून पोलिसांच्या स्वाधीन केले.  

 

बातम्या आणखी आहेत...