आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

OMG: झाडावर उगवला रक्ताने माखलेला मेंदू, शास्त्रज्ञांसाठीही ठरले आहे कोडे, लोक म्हणतात- सैतानाचा होणार आहे जन्म!

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

(ही कहाणी 'शॉकिंग डिस्कव्हरी' सिरीजअंतर्गत आहे. जगभरात अनेकदा कळत-नकळत असे शोध लागले आहेत, ज्यांच्याबाबत अनेकांना माहिती नसते.)

 

डेन्मार्क - डेन्मार्कच्या एका वस्तीत एका झाडावर उगवलेल्या मेंदूमुळे खळबळ उडाली आहे. वास्तविक, येथे राहणारा एक व्यक्ती डॉगला फिरवण्यासाठी घरातून निघाला होता. तेवढ्यात त्यांची नजर या झाडावर गेली. झाडावरील दृश्य पाहून त्यांची घाबरगुंडी उडाली. त्यावर रक्ताने माखलेला एका मेंदू चिकटलेला होता. दुसरीकडे त्यातून निघालेला झाडाचा भाग मुळांसोबत जमिनीत गेलेला होता. 

 

सोशल मीडियावर व्हायरल...
- हे फोटोज या झाडाला पाहणाऱ्या 39 वर्षीय एम. एस. नॉसगार्ड नावाच्या माणसाने शेअर केले आहेत. या फोटोजनी इंटरनेटवर धुमाकूळ घातलेला आहे. एवढेच नाही, त्यांनी याचा व्हिडिओ शूट करून तो तज्ज्ञांनाही शेअर केला आहे.

- नॉसगार्ड म्हणाले, ''मी माझ्या डागीसोबत फिरत होतो, तेवढ्यात माझी नजर या झाडाकडे गेली. मी घाबरूनच गेलो. असे झाड मी आयुष्यात कधीच पाहिले नव्हते.''

 

शास्त्रज्ञांसाठीही ठरले आहे कोडे
- मीडिया रिपोर्ट्सनुसार, या फोटोला पाहिल्यानंतर काही शास्त्रज्ञांनीही तेथे जाऊन तपासणी केली. परंतु त्यांना रहस्य उलगडले नाही. तथापि, काही तज्ज्ञ सांगतात की, ही एका प्रकारची फंगस असू शकते, जी कच्च्या मांसासारखी दिसते आणि त्यातून लाल रंगाच्या पाण्याचा स्राव होतो.

 

सोशल मीडियावर बनला वादाचा विषय
- हे चित्रविचित्र फोटोज आणि व्हिडिओ व्हायरल होताच सोशल मीडियावर वेगवेगळ्या रिअॅक्शन येत आहेत. काही म्हणतात की, त्या झाडावर सैतान जन्मणार आहे, तर काहींनी याला झाडाचेच मांस असल्याचे सांगून टाकले. परंतु, ही मेंदूसारखी दिसणारी वस्तू प्रत्येकासाठी गूढ बनून राहिली आहे.

 

पुढच्या स्लाइडवर पाहा, संबंधित Video व आणखी Photos... 

 

बातम्या आणखी आहेत...