आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लॉटरीच्या पैशात जमीन विकत घेतली, खोदकामात खजिना सापडला

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • 100 वर्षे जुने नाणे सापडले

कोच्ची- एखादा व्यक्ती किती नशीबवान असतो, हे कोच्चीमधील एका व्यक्तीकडे पाहून समजू शकेल. केरळ राज्यातील रत्नाकरन पिल्लई यांना 6 कोटी रुपयांची लॉटरी लागली. त्या पैशातून त्यांनी जमीन विकत घेतली. काही दिवसानंतर त्या जमिनीवर खोदकाम करत असताना त्यांना खजिना सापडला आहे. 
रत्नाकरण आपल्या लॉटरीच्या पैशात खरेदी केलेल्या जमिनीत काम करत होते, तेव्हा त्यांना जमिनीखाली 20 किलो पुरातन नाणे सापडले. पुरातत्व विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार हे नाणे अंदाजे 100 वर्षांपेक्षाही जास्त जुने आहेत. 1885 ते 1994 या काळात या परिसरात राजा श्री चिथीरा थिरुनाल बाला राम वर्मा यांचे राज्य होते. त्याकाळातले हे नाणे असल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे.

बातम्या आणखी आहेत...