फसवणूक / ई-कॉमर्स साइटकडून रजनीकांतची फसवणूक; 93 हजारांच्या आयफोन ऐवजी कंपनीने पाठवला नकली फोन

  • बंगळुरूच्या रजनीकांत कुशवाह यांची फ्लिपकार्टकडून फसवणूक, फोन रिप्लेस करण्याचे दिले आश्वासन 

दिव्य मराठी वेब टीम

Dec 13,2019 04:17:25 PM IST


गॅजेट डेस्क - बंगळुरू येथील रजनीकांत कुशवाह यांना ई-कॉमर्स वेबसाइटवरून खरेदी करणे चांगलेच महागात पडले आहे. कुशवाह यांनी देशातील सर्वात मोठी ई-कॉमर्स कंपनी फ्लिपकार्टवरून अॅपलचा लेटेस्ट स्मार्टफोन आयफोन 11 प्रो ऑर्डर केला होता. अनेक दिवसांच्या प्रतिक्षेनंतर फोनची डिलिव्हरी झाली असता बॉक्स उघडताच रजनीकांत यांना धक्का बसला. त्या बॉक्समध्ये नकली फोन होता, त्यावर आयफोन 11 प्रोच्या ट्रिपल रिअर कॅमऱ्याचे स्टीकर चिटकवलेले होते. कुशवाह यांनी सांगितले की, त्यांनी फोनचे संपूर्ण पैसे दिले आहेत. फ्लिपकार्टमार्फत आपले उत्पादने विकणाऱ्या थर्ड पार्टी कंपन्यांनी अशाप्रकारचा निष्काळजीपणा केला असेल असे कुशवाह म्हणाले.

काय आहे संपूर्ण प्रकरण

बंगळुरूतील रहिवासी रजनीकांत कुशवाह यांनी फ्लिपकार्टवरून 93,900 रुपये किमतीचा आयफोन 11 प्रो बुक केला होता. बऱ्याच दिवसांच्या प्रतिक्षेनंतर मोबाइल घरी आला. मात्र बॉक्स उघडताच त्यातील फोन पाहून त्यांना धक्का बसला. बॉक्समध्ये आयफोन एक्सएस सारखा दिसणारा नकली फोन होता. हा फोन दुसऱ्याच ओएसवर काम करत होता. त्यामध्ये अनेक अँड्राईड अॅप प्री-लोडेड होते. इतकेच नाही तर यामध्ये आयफोन 11 प्रोमध्ये मिळणाऱ्या ट्रिपल रिअर कॅमेराचे स्टीकर चिटकवलेले होते. दरम्यान, तो फोन लवकरच रिप्लेस करणार असल्याचे फ्लिपकार्टने आश्वासन दिले.


X
COMMENT