Home | International | Other Country | Man get Shocked after knowing that he is not Biological father of his son

प्रेग्नंट होण्यासाठी महिलेने डॉक्टरच्या मदतीने केले असे काही, समजल्यानंतर पतीला बसला जोरदार धक्का

दिव्य मराठी वेब टीम | Update - Sep 04, 2018, 12:24 PM IST

मुलगा जेव्हा एक वर्षाचा झाला तेव्हा त्याने मुलाची डीएनए टेस्ट केली त्यानंतर त्याला पत्नीच्या या कृत्याबाबत समजले.

 • Man get Shocked after knowing that he is not Biological father of his son

  इंटनॅशनल डेस्क - रशियाच्या मॉस्कोमध्ये एक धक्कादायक प्रकरण समोर आले आहे. याठिकाणी एका महिलेने प्रेग्नंट होण्यासाठी पतीच्या स्पर्मऐवजी तिच्या बॉयफ्रेंडच्या स्पर्मचा वापर केला. विशेष म्हणजे याबाबत तिच्या पतीला मुलगा एक वर्षाचा झाल्यानंतर समजले. पत्नीने स्वतःदेखिल हे मान्य केले आहे.


  डॉक्टरला सांगितले मुलाचा पिता बॉयफ्रेंडच हवा
  मीडिया रिपोर्ट्सनुसार 38 वर्षीय यना अनोखिना हिने प्रेग्नंट होण्यासाठी आयव्हीएफ तंत्राचा वापर केला. त्यासाठी ती एखा दवाखान्यात गेली. तिने याठिकाणी डॉक्टरला सांगितले की, तिचे ज्या व्यक्तीवर प्रेम आहे, तोच तिच्या मुलाचा पिता असावा अशी तिची इच्छा आहे. त्यानंतर तिने पतीऐवजी बॉयफ्रेंडच्या स्पर्मचा वापर केला आणि ती प्रेग्नंट झाली.


  पतीला बसला धक्का
  या सर्व प्रक्रियेदरम्यान यनाचा पतीदेखिल तिच्याबरोबर होता. पण त्याला याबाबत काहीही समजले नाही. मुलगा जेव्हा एक वर्षाचा झाला तेव्हा त्याला पत्नीच्या या कृत्याबाबत समजले. त्याने जेव्हा मुलाची डीएनए टेस्ट केली तेव्हा त्याला धक्का बसला. तो मुलाचा पिता नसल्याचे या टेस्टमधून समोर आले.


  हॉस्पिटलला भरावा लागला दंड
  यानंतर पतीने सर्वात आधी हॉस्पिटलविरोधात खटला दाखल केला. हॉस्पिटलला 4.2 लाख रुपये दंडापोटी भरावे लागले. नैतिक आणि आर्थिक नुकसानाची भरपाई करण्यासाठी हा दंड झाला. पत्नीवर प्रचंड विश्वास होता, असेही हा व्यक्ती म्हणाला. तो पत्नीपासून विभक्त झाला. दोघेही आता नवीन रिलेशनशिपमध्ये आहेत.

Trending