Home | National | Other State | man gets 10 year jail sentence for forcing wife to perform acts with dog

लग्नानंतर 5 वर्षे सगळं काही सुरळीत होतं, तीन मुले झाली पण नंतर झाले असे काही की पत्नीला जावे लागले न्यायालयात

दिव्य मराठी वेब टीम | Update - Apr 13, 2019, 05:26 PM IST

कोर्टाने महिलेचे बोलणे ऐकल्यावर याला जघन्य अपराध असल्याचे म्हणाले, नंतर पतीला सुनावली कडक शिक्षा

 • man gets 10 year jail sentence for forcing wife to perform acts with dog

  नॅशनल डेस्क(बेळगाव)- कर्नाटकाच्या जिल्हा न्यायालयाने पत्नीवर अनैसर्गिक शारिरीक संबंध बनवण्यासाठी दबाव टाकणाऱ्या पतीला 10 वर्षांची शिक्षा सुनावली आहे.त्यासोबतच त्याचावर साडे अकरा हजार रूपयांचा दंड ठोठावला आहे. आरोपी पत्नीला पॉर्न फिल्म दाखवून त्याप्रमाणे सेक्स करण्यासाठी दबाव टाकत होत आणि आपल्या घरातील पालीव कुत्र्यासोबतही सेक्स करण्याचे सांगत होता. या सगळ्या गोष्टीने त्रस्त होऊन महिलेने 27 मार्च 2017ला आरोपी पती विरोधात तक्रार दाखल केली होती.


  दोन वर्षांपासून तुरूंगात आहे पती
  - हे प्रकरण कर्नाटकच्या बेळगाव जिल्ह्यातील हुलकुंड गावात घडले. येथील एका 27 वर्षीय महिलेने आपल्या पतीविरोधत तक्रार दाखल केली आहे. आपल्या तक्रारीत पत्नीने पतीवर मारहाण करणे आणि मुलांसोबत घराबाहेर काढण्याचा आरोप केला आहे.
  - पोलिसांनी सांगित्याप्रमाणे त्यांचे लग्न 9 वर्षांपूर्वी झाले होते. लग्नानंत 5 वर्षांपर्यंत सगळं काही सुरळीत होतं, या 5 वर्षांत त्यांना 3 मुलेदेखील झाली. पण प्रॉब्लेम तेव्हा सुरू झाली, जेव्हा महिला पतीच्या लैंगिक इच्छा पूर्ण करत नव्हती.
  - आरोपी पती पत्नीला मोबाईलवर पॉर्न फिल्म्स दाखवत होता आणि त्याप्रमाणे करायला सांगत होता. पण महिला यासाठी तयार नव्हती होत, आणि यामुळेच त्यांच्यात वाद झाला. मार्च 2017मध्ये व्यक्तीने आपल्या घरात एक कुत्र्याचे पिल्लू आणले.
  - त्यानंतर तो व्यक्ती पत्नीला कुत्र्यासोबत संबंध बनवायला सांगत होता. आणि तीनवेळेस त्याने कुत्र्यासोबत संबंध बनवायला लावले.
  - या सगळ्यांचा विरोध केल्यामुले आरोपीने महिलेला घरातून बाहेर हकलण्याची धमकी देत होता. या सगळ्यांना त्रस्त होऊन महिलेने शेवटी पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली.
  - जामीन अर्ज रद्द केल्यामुळे, आरोपी दोन वर्षांपासून तुरूंगात आहे. या प्रकरणी कोर्टाने निर्णय देऊन आरोपीला 10 वर्षांच्या कारावासाची शिक्षा सुनावली आहे.

Trending