आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शीख व्यक्तीच्या डोक्यावरील पगडी काढल्यामुळे 3 वर्षांचा तुरूंगवास, आरोपीला शिख धर्माचे अध्ययन करण्याचाही कोर्टाचा आदेश

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

न्यूयॉर्क(अमेरिका)- येथील एका न्यायालयाने आरोपीला तीन वर्षांची शिक्षा सुनावली आणि त्यासोबतच शिख धर्माचे अध्ययन करून त्यावर एक रिपोर्ट सादर करण्याचा आदेश दिला आहे. त्यासाठी आरोपीला स्थानिक गुरूद्वाराच्या वार्षिक कार्यक्रमात भाग घेण्याचे सांगितले. या आरोपीचे नाव अँड्रू रामसे(25) असून त्याने शिख दुकानदार हरविंदर सिंग डोड यांना मारहाण करून धमकी दिली होती.


सिगरेट दिली नाही म्हणून झाला वाद
अमेरिकेतील शिखांच्या अधिकारांसाठी लढणारी सर्वात मोठी संघटना 'शिख कोअलिशनने' दिलेल्या माहितीनुसार, हरविंदरची ऑरेगन राज्यात एक दुकान आहे. 14 जानेवारी रोजी रामसे तिथे आला आणि त्याने सिगरेट मागितली. यावर हरविंदरने कायद्याअंतर्गत त्याला ओळखपत्र मागितले, पण रामसेने आपल्याकडे ओळखपत्र नसल्याचे सांगितले. त्यामुळे हरविंदरने त्याला सिगरेट देण्यास नकार दिला.


द्वेषयुक्त गुन्ह्यात दोषी
माहितीनुसार, रामसेने हरविंदरला त्यांच्या धर्मामुळे मारहाण केली, पगडी काढली, दाढी ओढली, त्यांच्यावर थुंकला आणि धमकीही दिली. ऑरेगन कायद्याअंतर्गत मारिऑन काउंटीचे न्यायाधीश लिंड्से पार्टि्ड्ज यांनी रामसेला द्वेषयुक्त गुन्ह्यासाठी दोषी ठरवले आहे.

 

‘शिखांचा अनेक वेळा द्वेष’
न्यायाधीशांनी सांगितले की, अशा प्रकारचा गुन्हा अज्ञानाचा परिणाम आहे. तसेच कोर्टात हरविंदरने दिलेल्या साक्षित म्हटले की, प्रत्येक नागरिकाला भयमुक्त जगण्याचा अधिकार असावा. मग तो कोणत्याही धर्म किंवा संप्रदायचा असो. शिख संघटनेनुसार, अमेरिकामध्ये अनेकदा शिख समाजाला द्वेषाचा सामना करावा लागला आहे. त्यामुळे न्यायालयाचा हा निर्णय ऑरेगन राज्यातील विविध समुदायांना द्वेषयुक्त गुन्ह्यापासून सुरक्षित ठेवण्याच्या दिशेने एक महत्वाचे पाऊल आहे.

 

एक वर्षात या प्रकरणात 40 टक्के वाढ
एफबीआयच्या रिपोर्टनुसार, मागील एक वर्षात ऑरेगनमध्ये 'हेट क्राइम' प्रकरणात तब्बल 40 टक्क्यांनी वाढ झाली आहे. मागच्या मे महिन्यात ऑरेगन अॅटॉर्नी जनरल अॅलेन रोसेनब्लम यांनी, द्वेषांचे गुन्हे रोखण्यासाठी एक विशेष टास्क फोर्स तयार केली होती. तसेच अशा प्रकारचे गुन्हे थांबवण्यासाठी नुकतेच एक सीनेट बिल 577 सादर करण्यात आले आहे.