रात्री चवीने खाल्ले / रात्री चवीने खाल्ले मासे, 12 तासांनी असा सुजला हात; डॉक्टरांकडे गेल्यावर कळले भयंकर सत्य!

दिव्य मराठी वेब टीम

Aug 30,2018 12:02:00 AM IST

जियोनजू - साऊथ कोरियामध्ये एका व्यक्तीला मासे खाणे खूप महागात पडले. मासे खाल्ल्याच्या 12 तासांनीच त्याचा एक हात बॉलसारखा सुजला आणि प्रचंड वेदना सुरू झाल्या. हातांवर मोठमोठे व्रण पडले. जेव्हा डॉक्टरांना दाखवले तेव्हा कळले की, मासे खाल्ल्याने या व्यक्तीला भयंकर बॅक्टीरियल इन्फेक्शन झाले आहे. जेव्हा तमाम उपचार अयशस्वी ठरले, तेव्हा रुग्णाचा जीव वाचवण्यासाठी डॉक्टरांना त्याचा एक हात कापावा लागला.

व्रणांनी घेतले अल्सरचे रूप
- ही घटना सियोलपासून 118 मैल दूर जियोनजू शहरातील आहे. येथील रहिवासी एका 71 वर्षीय बुजुर्गाने सीफूडमध्ये सुशी फिश खाल्ली होती.

- न्यू इंग्लंड जर्नल ऑफ मेडिसिननुसार, यानंतर बुजुर्गाचा एक हात सुजू लागला आणि त्याला प्रचंड ताप असण्यासोबतच हातांमध्ये भयंकर वेदना होऊ लागल्या.
- हे सर्व दोन दिवस सुरू होते. त्याच्या हातांवर काळ्या रंगाचे व्रण झाले, जे हळूहळू पूर्ण हातावर पसरले.
- डॉक्टरांनी जेव्हा तपासणी केली तेव्हा ते विब्रियो वुल्निफिकस बॅक्टीरिया इंफेक्शन असल्याचे आढळले. बुजुर्गाला दोन प्रकारच्या अँटिबायोटिक्स देण्यात आल्या, परंतु प्रकृतीत फरक पडला नाही.
- डॉक्टरांनी सांगितले की, प्रकृती आणखी ढासळत होती. हातावरी व्रणांनी अल्सरचे रूप घेतले होते, जे नेक्रोसिस (पेशींचे गळणे) चे कारण ठरले.
- यामुळे जिवंत पेशी गळू लागल्या आणि जखमेचा आकार वाढतच जाऊ लागला. बुजुर्गाला डायबिटीज आणि ब्लड प्रेशरचा त्रास असल्याने जखमा भरणे कठीण होऊन बसले.
- घटनेच्या जवळजवळ 25 दिवसांनी डॉक्टरांनी मोठा निर्णय घेतला. जखमा भरून न आल्याने त्यांनी बुजुर्गाचा एक हात कापून वेगळा केला. तेव्हा कुठे त्यांच्या प्रकृतीत सुधारणा झाली आणि त्यांना घरी जाता आले.

काय आहे हे इन्फेक्शन?
कच्च्या सीफूडसारखी शेलफिश, ओएस्टर आणि फिश खाल्ल्याने साधारणपणे कोणीही विब्रियो वुल्निफिकस बॅक्टीरिया इन्फेक्शन होऊ शकते. सुदृढ प्रकृत असलेल्यांना यामुळे जास्त त्रास होत नाही, लवकरच ते यातून सावरतात. परंतु रोगप्रतिकारक शक्ती कमी असलेले आणि बुजुर्गांमध्ये हे इंफेक्शन खूप लवकरच उग्र रूप धारण करते. यामध्ये जीवसुद्धा जाऊ शकतो.

पुढच्या स्लाइडवर पाहा, या गंभीर आजाराचे आणखी Photos..

X
COMMENT