आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लँडलाइन फोनमधून येत नव्हता आवाज; मालकाने बोलावला टेक्निशियन, त्याने फोन खोलला तर समोर आला धक्कादायक प्रकार...

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सिडनी- ऑस्ट्रेलियामध्ये एका व्यक्तीने आपला जुना लँडलाइन फोन खोलून पाहिला तेव्हा हैरान करणारी गोष्ट समोर आली. लँडलाइन फोन खोलल्यानंतर त्यात डझनभर झुरळ मृत अवस्थेत आढळून आले. त्यानंतर त्याने या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केल्याच्या काही तासांतच लाखो लोकांनी तो पाहिला. त्याने पोस्टमध्ये लिहले की, 'मी जेव्हा घरात काम करत होतो त्यावेळी माझ्या मालकाने मला फोन खोलण्यासाठी सांगितले. मी फोन खोलला तेव्हा हे विचित्र दृश्य समोर आले. '

 

फोनमधून येत नव्हता व्यवस्थित आवाज
>  घरमालकाने लँडलाइन फोन खराब झाल्यानंतर तो रिपेअर करण्यासाठी टेक्निशियनला बोलावले होते. त्यानंतर टेक्निशियनने तो फोन खोलायला घेतला. परंतू त्याचे कव्हर खोलताच त्यातून डझनभर झुरळ मृत अवस्थेत आढळले. ते पाहून तो हैरान झाला.

> टेक्निशियनने सांगितल्यानुसार, आतापर्यंत त्याने पहिल्यांदा अशाप्रकारची घटना पाहिली होती. त्याने संपूर्ण दृश्य आपल्या फोनमध्ये कैद करुन सोशल मीडियावर शेअर केले. या घटनेचा व्हिडिओ शेअर होताच जवळपास लाखो लाखो लोकांनी तो पाहिला. याविषयी प्रतिक्रिया व्यक्त करताना अनेक युझर्सनी म्हटले की, हा एकदम किळसवाणा प्रकार आहे. तर एकाने लिहले की, 'तुमचा फोन झुरळ खाऊ लागला आहे.' सध्या हा व्हिडिओ व्हायरल होत असून सोशल मीडियावर याविषयी चर्चा होत आहे.

 

 

बातम्या आणखी आहेत...