आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

स्वतःवर उपचार करण्यासाठी व्यकी शरीरात इंजेक्ट करत होता स्वतःचे स्पर्म, पण हात सुजल्यामुळे गेला डॉक्टरांकडे; डॉक्टरही झाले थक्क

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक


डबलिन : आर्यलंड येथे राहणाऱ्या एक व्यक्तीने आपल्या पाठीच्या वेदनेपासून सुटका मिळविण्यासाठी वेगळाच मार्ग अवलंबने महाग पडले आहे. यामुळे त्याचा हात भयंकर सुजला आहे. आपल्या हाताचा उपचार करण्यासाठी डॉक्टरांकडे गेला असता त्याने अवलंबलेला मार्गाबद्दल माहित झाल्यावर डॉक्टरही हैराण झाले. आपल्या पाठीच्या वेदनेपासून सुटका मिळविण्यासाठी असे केल्याचे त्याने सांगितले. पण याचा विपरीत परिणाम झाला. 

 

वेदनेपासून सुटका मिळावी यासाठी अवलंबला असाधारण मार्ग

> आर्यलंडच्या डबलिन येथे राहणाऱ्या 33 वर्षीय युवकाची ही गोष्ट आहे. तो दीर्घ काळापासून कमरेच्या खालच्या भागातील वेदनेने ग्रस्त होता. बऱ्याच काळानंतरही वेदनेपासून सुटका न मिळाल्यामुळे उपचारासाठी तो रूग्णालयात गेला. 

> उपचारादरम्यान व्यक्तीचा उजवा हात लाल होऊऩ सुजल्याचे डॉक्टरांच्या निदर्शनात आले. 
 
> यानंतर डॉक्टरांनी विचारपूस केली असता, कमरेच्या वेदनेपासून सुटका मिळविण्यासाठी गेल्या दीड वर्षापासून स्वतःचे स्पर्म इंजेक्शनने शरीरात सोडत असल्याचे त्याने सांगितले. 
 
> डॉक्टरांनी तपासणी केली असता, त्याच्या हातामध्ये सेल्युलाइटिसमुळे इंफेक्शन झाले होते. यामुळे त्याचा हात सुजला होता. मेडिकल रिपोर्ट्समध्ये याला धोकादायक सांगितले आहे. 


डॉक्टरांचे म्हणणे आहे की, आमच्याकडे आलेले अशाप्रकारचे पहिलेच प्रकरण

> आपल्यासाठी एक हायपोडर्मिक नीडल (इंजेक्शन) खरेदी केले होते. आणि मागील 18 महिन्यांपासून याद्वारे तो महिन्यातून एकदा स्वतःचे स्पर्म स्वतःच्या शरीरात इंजेक्ट करत असल्याचे व्यक्तीचे म्हणणे आहे. 

> या विचित्र उपचार पद्धतीमुळे त्याच्या वेदनेमध्ये काही फरक पडला नाही. पण त्याच्या हातात इंफेक्शन झाले. 

> यानंतर व्यक्ती उपचारासाठी रूग्णालयात गेला. तेथे त्याच्यावर उपचार करणारी डॉ.डुनचे म्हणणे आहे की, बेजबाबदारीमुळे त्याचे स्पर्म लीक होऊन नरम उतींमध्ये गेले होते. आमच्याकडे अशाप्रकारचे पहिलेच प्रकरण आले आहे. याआधी स्पर्मला माणसाच्या नसांमध्ये किंवा शरीरात इंजेक्ट करण्याच्या प्रभावावर कोणतेही परीक्षण करण्यात आले नाही. 
 

बातम्या आणखी आहेत...