आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

झोपताच व्हायचा बलात्कार, तिला कळलेच नाही; मग हाती लागली स्वतःच्या ब्लू फिल्मने भरलेली प्रियकाराची हार्डडिस्क, कोर्टाने सुनावली 9 वर्षांची शिक्षा

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मेलबर्न - ऑस्ट्रेलियात एका 23 वर्षीय युवकाला कोर्टाने आपल्याच प्रेयसीवर अत्याचार प्रकरणी 9 वर्षांची कैद सुनावली आहे. कोर्टाने त्या शिक्षा देताना अशाच माणसांमुळे तरुणी पुरुषांवर विश्वास ठेवत नाहीत असे म्हटले आहे. सोबतच, आरोपीने आपल्या गर्लफ्रेंडला माणसाची नव्हे, तर एका सेक्स डॉलची वागणूक देऊन स्वतःच्या वासना पूर्ण केल्या. अशा व्यक्तीला पॅरोल सुद्धा मिळू नये असेही न्यायाधीशांनी म्हटले आहे. पीडित तरुणीच्या हातात आरोपी प्रियकराची हार्ड डिस्क आली नसती तर तो गेल्या 10 महिन्यांपासून काय करतोय याचा पत्ता लागला नसता.


आता झोपतानाही भीती वाटते...
जॅक मोरिसन नावाचा हा युवक 2016 पासून एका तरुणीच्या संपर्कात आला. दोघांचे प्रेम जुळले आणि एकमेकांच्या भेटी घेण्यास सुरुवात झाली. जॅक अतिशय लाजाळू आणि शांत स्वभावाचा होता. तरुणीला जॅक एक आदर्श बॉयफ्रेंड वाटत होता. काही गेल्या वर्षीच जुलै महिन्यात तिला आपल्या घरात जॅकची एक हार्ड डिस्क सापडली. तो हा मेमरी डिव्हाइस जपून ठेवण्यास विसरला होता. तिने ही ड्राइव्ह आपल्या कंप्यूटरला कनेक्ट केली. आतील फाइल पाहिल्या तेव्हा तरुणीच्या पायाखालची वाळूच सरकली. त्या हार्ड डिस्कमध्ये तिचेच पॉर्न व्हिडिओ होते. एकूणच 8 व्हिडिओ तिच्या बॉयफ्रेंडने ती झोपेत असताना बनवले होते. 10 महिने हे दोघे रिलेशनमध्ये होते या दरम्यान त्याने 8 वेळा ती गाढ झोपेत असताना तिच्यावर बलात्कार केला आणि व्हिडिओ बनवल्याचे हे पुरावे होते. प्रत्येकवेळा बलात्कार करण्यापूर्वी तो पीडितेला ड्रग्स द्यायचा असा आरोपही लावण्यात आला आहे. या संपूर्ण प्रकरणानंतर आपल्याला झोपतानाही भीती वाटते असे तिने म्हटले आहे.


मोबाईल इंटरनेट सर्चमध्ये सापडले असे काही...
हार्ड डिस्कचा पुरावा घेऊन तरुणीने थेट पोलिस स्टेशन गाठले आणि जॅक विरोधात बलात्काराची तक्रार दाखल केली. पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन मोबाईल जप्त केला. मोबाईलमध्ये इंटरनेट सर्च तपासून पाहिल्यास तो पॉर्न आणि त्यातही स्लीपिंग सेक्सचा वेडा होता असे समोर आले. त्याच्या मोबाईलमध्ये अशा प्रकारच्या क्लिप देखील सापडल्या. कोर्टाने या प्रकरणात जवळपास वर्षभर चाललेल्या सुनावणीनंतर अखेर जॅकला दोषी मानले. तसेच 9 वर्षांची कैद सुनावली. कैदेत असताना 2025 पर्यंत त्याला जामीन किंवा पॅरोल मिळणार नाही.

 

बातम्या आणखी आहेत...