आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Man Ki Bat : Anarchy, Instability, Anger Among The Youth Of The Country, Youth Became Priority In The 60th Episode

अराजक, अस्थैर्य, घराणेशाहीबद्दल देशातील युवकांच्या मनात चीड, 60व्या भागात पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या केंद्रस्थानी युवक

2 वर्षांपूर्वीलेखक: प्रतिनिधी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली : आकाशवाणीवरील मन की बात'च्या ६० व्या व २०१९ च्या शेवटच्या भागात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी युवक केंद्रस्थानी ठेवून जनतेला नववर्षाच्या शुभेच्छा दिल्या. मोदी म्हणाले, आगामी दशकांमध्ये भारतीय युवकांची भूमिका महत्त्वाची राहणार आहे. आजचा युवक व्यवस्था स्वीकारण्यास प्राधान्य देतो. ही व्यवस्था योग्य कार्यरत नसेल तर तो व्यवस्थेला प्रश्नही करतो. ही चांगली गोष्ट आहे. अराजकतेबद्दल युवकांना प्रचंड चीड आहे. जातीयवाद आणि घराणेशाही या युवकांना आवड नाही. तो जातीपातीपेक्षा पुढे जाऊन विचार करतो. मन की बातच्या या भागात मोदींनी पूर्णपणे देशातील युवकाला केंद्रस्थानी ठेवून त्यांच्यावर भाष्य केले. युवकच या देशाची शक्ती असल्याचे त्यांनी नमूद केले.

२०२२ साठी स्वदेशीचा नारा

२०२२ पर्यंत देशतील नागरिकांनी स्थानिक ठिकाणी निर्मिती वस्तूंच्या खरेदीवर भर द्यावा, असे आवाहन मोदी यांनी केले. हे काम सरकारी ढंगात व्हायला नको. युवकांनी छोट्या संघटना स्थापन करून स्थानिक खरेदीवर लक्ष द्यावे. गांधीजींनी १०० वर्षांपूर्वी भारतीय उत्पादनांना प्रोत्साहन देण्यासाठी जनांदोलन उभे केले होते. स्वयंपूर्णतेसाठी त्यांनी दाखवलेला हा उत्तम मार्ग आहे, असेही ते म्हणाले.

खगोलशास्त्राकडे लक्ष देण्याची गरज

सूर्यग्रहण, आर्यभट्ट, भास्कराचार्य याचे सविस्तर संदर्भ देत मोदी म्हणाले, भारतीय युवकांनी आता खगोलशास्त्राकडे लक्ष देण्याची गरज आहे. इस्रोकडे अॅस्ट्रोसेट नावाचा सक्षम कृत्रिम उपग्रह आहे. आता सूर्याची माहिती घेण्यासाठी इस्रो 'आदित्य' नावाचा उपग्रह प्रक्षेपित करणार अाहे. हे भारताचे मोठे यश ठरेल.

संसदेने ६० वर्षांचा कामाचा विक्रम मोडला

संसद हे लोकशाहीचे मंदिर आहे. आज मी अभिमानाने सांगू इच्छितो की, तुम्ही ज्या खासदारांना निवडून दिले त्यांनी सभागृहातील कामकाजाबाबत गेल्या ६० वर्षांचा विक्रम मोडला आहे. गेल्या ६ महिन्यांत १७ व्या लोकसभेत तसेच संसदेतील दोन्ही सभागृहांत खासदारांनी विक्रमी काम केले असल्याचे मोदी म्हणाले.

प्रत्येकात स्वयंपूर्णता हवीच

जम्मू-काश्मीरमधील हिमायत कार्यक्रमाचा' उल्लेख करून मोदी म्हणाले, यात १८ हजार युवकांना प्रशिक्षण देण्यात आले, शिवाय ५ हजार युवकांना रोजगारही मिळाला. हिमायत कार्यक्रम कौशल्य विकासाशी संबंधित आहे. देशातील प्रत्येक नागरिक स्वयंपूर्ण होणे आणि सन्मानाने जगणे महत्त्वाचे आहे.
 

बातम्या आणखी आहेत...