आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मेहुण्याच्या बोलण्याने संतापला साला, पाय तोडण्याचा प्लान करून गेला होता, पण जीव जाईपर्यंत करत राहीला तलवारीचे वार

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मृताची पत्नी. - Divya Marathi
मृताची पत्नी.

जालंधर - जिल्ह्यातील बेगमपुरा येथे 6 वर्षांपूर्वी प्रेमविवाह केलेल्या तरुणाची त्याच्या तीन साल्यांनी अक्षरशः तलवारीने कापून हत्या केली. हत्या झालेल्या जगदीप सिंहचा सख्खा साला आणि त्याच्या तुलत भावांनी ही हत्या केली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपींचा आठवडाभरापूर्वी जगदीपबरोबर वाद झाला होता. त्यावेळी जगदीप म्हणाला होता, तुम्ही माझे काही बिघडवू शकत नाही, आता तर मला दोन मुलेही आहेत. 


 जीव जाईपर्यंत केले तलवारीचे वार 
- पोलिस तपासात समोर आले की, जगदीपने त्याच्याच बेगमपुरा गावातील मुलगी कुलवंत हिच्याशी 6 वर्षांपूर्वी लव्ह मॅरेज केले होते. पण कुटुंबीयांच्या विरोधानंतर लग्नानंतर 4 वर्षे ते दुसऱ्या गावात राहीले. 
- 2 वर्षांपूर्वी जगदीप आणि त्याची पत्नी बेगमपुरा येथे राहायला आले होते. जगदीपचे घर आणि त्याच्या सासरचे घर यात फक्त 100 मीटरचे अंतर आहे. 
- मृत जगदीप जेव्हा सासऱ्याच्या घरासमोरून जायचा तेव्हा तो त्यांच्या साल्यांना चीडवत काही कमेंट करत जायचा. त्यामुळे ते सर्व त्याचा बदला घेण्याच्या विचारात होते. 
- गुरुवारी सायंकाळी हरदीपने सुखदर्शन आणि जसवीरच्या मदतीने जगदीपच्या किराणा दुकानातच त्याच्यावर तलवारीने वार करत त्याचे तुकडे तुकडे केले. 

 

फक्त पाय तोडणार होेते 
- आरोपींनी आधी फक्त जगदीपचा पाय तोडण्याचा प्लान केला होता. पण तिघांनी दारु पिल्यानंतर जगदीपवर जेव्हा पहिला हल्ला केला तेव्हा तो वार त्याच्या गळ्यात लागला. 
- त्यानंतर त्यांनी आता जगदीपला संपवायचेच म्हणून तो मरेपर्यत त्याच्यावर जवळपास 15 वार केले. 
- पोलिसांनी एकालाही पकडले तरी लगेचच इतर दोघांची नावे सांगायची असे त्यांचे ठरले होते. त्यानुसार पोलिसांनी सुखदर्शनला पकडले तर त्याने लगेचच इतर दोघांची नावे सांगितली. 

बातम्या आणखी आहेत...