आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

झोपलेल्या मुलीचा गळा दाबून खून; पुतणी, आईवर केला जीवघेणा हल्ला

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पातूर- आई आपल्यापेक्षा मोठ्या भावाला अधिक जीव लावते, त्यामुळे संपत्तीतही आपल्यासोबत दुजाभाव होत असल्याच्या शंकेवरून पोटच्या मुलीसह कुटुंब संपवायला निघालेल्या नराधमाने झोपेतच असलेल्या तीन वर्षाच्या पोटच्या मुलीची गळा दाबून हत्या केली. त्यानंतर वयोवृद्ध आईला बांधून मारण्याचा प्रयत्न करताना पुतणी मध्ये आल्याने या दोघींवरही त्याने जीवघेणा हल्ला केला. त्यात पुतणी व आई गंभीर जखमी झाल्या आहेत. ही घटना पातूर शहरात मंगळवारी पहाटे तीन वाजताच्या सुमारास गहिलोत लेआऊटमध्ये घडली. पातूर पोलिसांनी आरोपीला तत्काळ अटक करून त्यांच्याविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. 
आरोपी गोपाल शंकर बेलूरकर (वय ३१) रा. खानापूर, हा पातूर येथील गहिलोत नगरमध्ये आईसह राहतो. त्याचा मोठा भाऊ बाबुराव बेलूरकर खानापूर येथे राहतो. त्यामुळे १५ वर्षीय पुतणी गायत्री ही त्याच्याकडे शिक्षणासाठी आहे. खानापूर येथे बेलुरकर कुटुंबीयांकडे १८ एकर शेती आहे बाबुराव हे खानापूर येथे शेती करतात. गोपालची आई मोठ्या भावाकडे जास्त लक्ष देते, आपल्याकडे तिचे दुर्लक्ष असल्याने संपत्ती मध्ये सुद्धा आपल्या सोबत दुजाभाव होईल, अशी शंका आरोपी गोपालचे मनात होती. त्याचा राग मनात ठेवून संपूर्ण कुटुंबालाच संपवण्याचा गोपालचा इरादा होता. दिवाळीमध्ये गोपालची पत्नी माहेरी आंबेटाकळी तालुका खामगाव जिल्हा बुलडाणा येथे गेली. ती अद्याप परत आली नव्हती. मंगळवारी सकाळी गोपाल याने तीन वाजताच्या सुमारास झोपलेल्या तीन वर्षीय मुलगी मयुरीचा गळा आवळून खून केला. नंतर घराच्या पाठीमागे साप निघाला असे म्हणून आईला घरामागे घेऊन गेला. तेथे तिचे हातपाय बांधण्याचा प्रयत्न केला; मात्र आईने आरडाओरड केल्याने पुतणी गायत्री झोपेतून जागी झाली व काकाला आवरण्याचा प्रयत्न केला असता त्याने तिच्या डोक्यात लोखंडी सळीने वार केले .त्यात तीसुद्धा गंभीर जखमी झाली. एकच आक्रोश झाल्याने शेजारी जागे झाले त्यानंतर पोलिसांना घटनेची माहिती दिल्यानंतर पोलिस तत्काळ घटनास्थळी पोहोचले पोलिसांनी आरोपी गोपाल याला अटक केली. त्याच्याविरुद्ध भादंवि ३०२, ३०७ नुसार गुन्हा दाखल केला आहे. घटनेचा तपास ठाणेदार डी.सी. खंडेराव करीत आहेत. 


पातूर येथील गहिलोत लेआऊट परिसरात घडली घटना 
पातूर येथील पोलिसांनी आरोपीला अटक करून त्यांच्याविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. 
आरोपीला पळून जाताना पोलिसांनी पकडले 


आरोपी गोपाल हा खानापूर येथे पळून जाण्याच्या बेतात असताना रात्रगस्तीवर असलेले पोलिस कर्मचारी दिनकर गुळदे व भूषण कुरेकर यांना दिसला त्यांनी त्याला पकडले असता त्याने खून केल्याची कबुली दिली. जखमी झालेली आरोपीची आई शकुंतलाबाई बेलूरकर, आणि जखमी पुतणी गायत्री बेलूरकर नंतर तो भावालाही करणार होता ठार .


मुलगी मुयुरी ,आई शकुंतलाबाई, पुतणी गायत्रीला ठार करून खानापूर येथे भाऊ बाबुराव यांना ठार मारण्याचा आरोपी गोपालचा इरादा होता, असे तपासात समोर आले. मात्र नागरिकांनी व पोलिसांच्या सतर्कतेमुळे पुढील अनर्थ टळला. 

 


 

बातम्या आणखी आहेत...