आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आपल्याच 5 मुलांची हत्या करणाऱ्या पित्याला झाली फाशीची शिक्षा, पण पत्नीने केली अशी मागणी की, संपुर्ण न्यायालयाला बसला धक्का...

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

वॉशिंग्टन - आपल्याच पाच मुलांच्या हत्येप्रकरणी दोषी ठरवण्यात आलेल्या अमेरिकेतील एका आरोपीला बुधवारी न्यायालयाने फाशीची शिक्षा सुनावली. पण आरोपीच्या पत्नीने त्याला दिलेली शिक्षा रद्द करण्याची न्यायालयाकडे मागणी केली आहे. आरोपी टिमोथी जोन्स (37) च्या सुनावणी दरम्यान आरोपी हा 'स्किझोफ्रेनिया' या मानसिक रोगाने त्रस्त असल्यामुळे त्याच्या विरोधात खटला चालऊ नये असा दावा केला होता. 


जोन्सला 2014 मध्ये एक ते आठ वर्षांदरम्यान वय असलेल्या आपल्या पाच मुलांच्या हत्येप्रकरणी दोषी ठरवण्यात आले होते. पण आरोपीच्या पूर्व पत्नीने दक्षिण कॅरोलिना न्यायालयात जेव्हा न्याधीशांकडे आपल्या पतीची शिक्षा माफ करण्याची विनंती तेव्हा संपूर्ण न्यायालयाला एकच धक्का बसला. माहितीनुसार, आरोपीची पूर्व पत्नी अँबर केजरने सांगितले की, त्याने माझ्या मुलांना अत्यंत क्रुर वागणूक दिली, पण माझे सर्व मुले त्याच्यावर खूप प्रेम करत होते. त्यामुळे माझ्यामुळे नाही तर, मुलांमुळे त्याची शिक्षा माफ करावी.


केजरने पुढे सांगितले, जॉन्स हा कंप्यूटर इंजिनिअर असल्यामुळे त्याला माझ्यापेक्षा अधिक पगार मिळायचा. त्यामुळे तो मुलांचे चांगले संगोपण करू शकतो, असा विचार करून केजरने त्याच्याकडे मुलांना सोपविले होते. पण एवढ्या गंभीर गुन्ह्यावर न्याधीशांना निर्णय देण्यासाठी दोन तासांपेक्षाही कमी वेळ लागला. यादरम्यान जॉन्सने न्यायालयात सांगितले होते की, त्याचा सहा वर्षाचा मुलगा त्याच्या आईसोबत मिळून माझ्याविरोधात कट रचत असल्याची शंका होती. यामुळे त्याने मुलाचे प्राण जाईपर्यंत त्याच्याकडून व्यायाम करवून घेतला.


त्यानंतर जॉन्सने इतर चार मुलांचा गळा आवळून खून केला. मुलांचे मृतदेह अल्बामातील डोंगरामध्ये फेकण्यापूर्वी तो नऊ दिवस कारमध्ये घेऊन फिरत होता. यादरम्याने त्याच्या गाडीत मृतदेहांमुळे दुर्गंधी पसरल्यामुळे एका ट्रॅफिक चेकपॉईंटवर त्याला अटक करण्यात आली.