आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

धक्कादायक: सासूने वाढलेले भजे थंड होते, म्हणून जावयाने जे केले त्याचा कुणी विचारही केला नसेल!

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

गाझीपूर - सासू-जावयाचे नाते म्हणजे मानापमान रंगणारच. काही वेळा जावई रुसून बसतो, तर कधी-कधी सासूचा मान वरचढ ठरतो. जावई जेवणार म्हटल्यावर तऱ्हेतऱ्हेचे पक्वान्न केले जातात. परंतु या शहरात साध्या भज्यांसाठी जावयाने सासूची थेट हत्याच केल्याची घटना घडली आहे. विश्वास बसणार नाही, पण हे खरं आहे. 

 

भज्यांवरून असा काही गहजब झाला की, रक्तपातापर्यँत विषय गेला. भज्यांसाठी हत्या केल्याची ही घटना दिल्लीतील आहे. येथे 24 वर्षीय अफरोज नावाच्या तरुणाने भज्यांसाठी आपल्या सासूचा खून केला. 

 

असे आहे प्रकरण
सूत्रांनुसार, अफरोजचे लग्न शाइस्ता नावाच्या तरुणीशी झाले होते. अफरोज आपल्या पत्नीसोबत केशवपुरमच्या जवळ दिल्लीच्या रामपुरा परिसरात राहत होता. लग्नाच्या काही महिन्यांनीच शाईस्ताची आई फौजिदा हीसुद्धा आपल्या मुलीच्या घरी राहायला लागली. अफरोजला सासूचे घरात राहणे पसंत नव्हते. यावरून पती-पत्नीत किरकोळ वादही व्हायचे.

 

एका दिवशी शाइस्ताने घरात सर्वांसाठी भजे तळले. त्या वेळी अफरोज घरी नव्हता म्हणून त्याच्यासाठी तिने भजे वेगळे काढून झाकून ठेवले. अफरोज घरी पोहोचल्यावर त्याला भजे वाढण्यात. परंतु ते थंड असल्याने पती-पत्नीत वाद सुरू झाला. शाइस्ताच्या आईने जावयाची समजूत घालण्याचा प्रयत्न केला, परंतु या गोष्टीवर नाराज होऊन अफरोजने घरात ठेवलेल्या चाकूने सासूवर हल्ला चढवला. अफरोजने सासूवर एकानंतर एक अनेक वार केले. त्याने पत्नीलाही गंभीर जखमी केले आहे. सासूच्या हत्येनंतर अफरोज फरार झाला.

 

हल्ल्यात गंभीर जखमी झाल्याने अफरोजची सासू फौजिदाचा मृत्यू झाला. याप्रकरणी अफरोजविरुद्ध हत्येचा गुन्हा दाखल झाल्यानंतर डीसीपींनी पूर्ण प्रकरणाचा तपास सुरू केला. पोलिसांना चकवा देत अफरोज कधी दिल्ली, तर कधी यूपी, तर कधी मुंबईत लपून राहू लागला. परंतु एका दिवशी पोलिसांनी अफरोजला यूपीच्या गाजीपूरमधून उचलले. तो तेथे मजूर बनून काम करत होता.

 

पोलिस त्याला पकडण्यासाठी गाजीपूरला पोहोचले. परंतु पोलिसांना पाहताच तो मोठमोठ्याने ओरडत धानाच्या शेतातून पळू लागला. गावकऱ्यांना संशय वाटल्याने तेही पोलिसांचा पाठलाग करू लागले. तब्बल 10 किमी पाठलाग केल्यानंतर पोलिसांनी अफरोजला पकडले. पोलिसांनी गावकऱ्यांना अफरोजचे सत्य सांगितले की, त्याच्यावर भज्यांसाठी सासूचा मर्डर केल्याचा आरोप आहे. हे ऐकताच गावकऱ्यांना धक्काच बसला.  

 

बातम्या आणखी आहेत...