आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नात्याला काळिमा फासणारी घटना; पत्नी आणि तीन मुलांचा चिरला गळा, रात्रभर मृतदेहाजवळ बसून राहीला आरोपी पती

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली- दक्षिण दिल्लीच्या महरौली परिसरात पतीनेच धारदार शस्त्राने गळा चिरून पत्नी आणि तीन मुलांची हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. पोलिसांनी शनिवारी आरोपी पतीला ताब्यात घेतले आहे. आरोपी उपेंद्र शुक्ला ट्यूशन टीचर आहे. तो तणावाखाली असल्याचा पोलिसांना संशय आहे. त्याने हत्या केली त्यावेळेस त्याची सासू घरातील दुसऱ्या रूममध्ये झोपली होती.


डीसीपी विजय कुमार यांनी सांगितले की, महरौलीमधील घरातून एक नोट मिळाली, ज्यात आरोपी उपेंद्रने पत्नी अर्चना आणि तीन 2, 5 आणि 6 वर्षीय मुलांची हत्या केल्याचे लिहीले होते. घटनेच्यावेळी उपेंद्रची सासू दुसऱ्या रूममध्यो झोपलेल्या होत्या. तुर्तास हत्येमागचे कारण अस्पष्ट आहे.


सासूने शेजाऱ्यांना बोलावले, मृतदेहांजवळ बसला हता उपेंद्र
पोलिसांनी सांगितल्यानुसार, उपेंद्रने सकाळी रूमचे दार उघडले नाही म्हणून सासूने शेजाऱ्यांना बोलावले. त्यानंतर शेजाऱ्यांनी दार तोडले, तर उपेंद्र रूममध्ये आपल्या पत्नी आणि मुलांच्या मृतदेहांजवळ बसला होता. रात्री पत्नी आणि मुले झोपलेली असताना त्यांचा खून करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले, घटनास्थळावरून एक चाकूही मिळाला आहे.