आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

फेसुबकवरून झालेल्या मैत्रीचे प्रेमात झाले रूपांतर, लग्नाआधीच युवती झाली प्रेग्नंट म्हणून कुटुंबीयांनी करून दिले लग्न, पण या कारणामुळे पतीने केली दोघांची हत्या...

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बेंगळुरू(कर्नाटक)- कर्नाटकात सोशल मिडियामुळे  एका कुटुंबाचा भंयकर अंत झाला आहे. येथील एका व्यक्तीने सोशल मिडीयाचा जास्त वापर करणाऱ्या आपल्या पत्नीची आणि तीन महिन्यांच्या चिमुकल्याची हत्या केल्याची घटना समोर आली आहे. पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले असून त्याने त्याच्या गुन्ह्याची कबुली दिली आहे. आरोपीची पत्नी फेसबुक आणि इंस्टाग्रामवर अनोळखी लोकांशी चॅटींग करयाची आणि वेळ वाया घालायाची. इतकच काय तर तिच्याकडे आपल्या तीन महिन्यांच्या मुलाला जेवण देण्यासाठी आणि त्याची काळजी घेण्याचाही  वेळ नसायचा.  


पत्नीला दगडाने ठेचून मारले
- घटना 20 जानेवारीला रामनगर जिल्ह्यात घडली. पोलिसांनी सांगितले की, मदनायकनहल्लीमध्ये राहणारा राजु आणि सुष्माची फेसबूकवरून मैत्री झाली, आणि काही दिवसानंतर ही मैत्री प्रेमात बदलली.


- लग्नाआधीच सुष्मा प्रेग्नंट झाली, त्यामुळेच दोघांच्या कुटुंबीयांनी त्यांचे लग्न लावून दिले. 6 महिन्यांपूर्वीच दोघांचे लग्न झाले होते आणि लग्नाच्या तीन महिन्यानंतर सुष्माने मुलाला जन्म दिला.


- पोलिसांना राजुने सांगितले की, सुष्मा नेहमीच फेसबूक आणि इंस्टाग्रामवर ऑनलाइन राहून अनोळखी व्यक्तीशी चॅटींग करायची आणि तिच्याकडे कुटुंबाकडे लक्ष देण्यासाठीही वेळ नव्हता. तिच्या अशा वागण्याने राजु त्रस्त झाला होता.


- ती इतक्यावेळ मोबाईलमध्ये व्यस्त असायची की, घरात जेवण बनवायला आणि घराची साफ सफाई करायलादेखील तिला वेळ नव्हता. तिला मी अनेकवेळा समजून सांगितले पण ती ऐकत नव्हती. 


- यामुळेच 20 जानेवारील राजुने आपल्या पत्नीला आणि मुलाला जंगलात नेले, आणि तिथे सुष्माला दगडाने ठेचून मारले. 


- त्यानंतर त्याने गाडीतील पेट्रोल सुष्माच्या अंगावर टाकून तिला आगेच्या स्वाधीन केले. नंतर त्याने आपल्या मुलाचाही गळा दाबून खून केला आणि जंगलात फेकून फरार झाला.

 

असा झाला घटनेचा खुलासा
- एका फॉरेस्ट ऑफीसरने जंगलात अर्धा जळालेला मृतदेह पाहिला आणि पोलिसांना सुचना दिली. तर तिकडे सुष्माच्या कुटुबींयानी अनेक दिवसांपासून बेपत्ता असलेल्या सुष्माला शोधण्यासाठी 26 जानेवारीला बेपत्ता असल्याची तक्रार पोलिसांत दाखल केली होती. पोलिसांनी संशयाच्या आधारे राजुला अटक केले, त्यानंतर चौकशी दरम्यान त्याने आपला गुन्हा कबुल केला.

बातम्या आणखी आहेत...