आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराधनबाद - झारखंडमधील बीसीसीएल कर्मचारी शिवचरण यांच्या नशेखोरीचा पत्नीने विरोध केला म्हणून त्याने लोखंडी रॉडने तिच्यावर हल्ला केला. त्यात पत्नी ललिताचा जागीच मृत्यू झाला. पतीने पत्नीचा मृतदेह एका खोलीत बंद करून ठेवला. तीन दिवस तो मृतदेहाबरोबरच राहिला. यादरम्यान 10 वर्षाच्या मुलीला मात्र त्याने आईपासून दूर ठेवले. कोणाला घरात येऊ दिले नाही किंवा तो स्वतःदेखिल बाहेर गेला नाही. पण मुलगी आईला भेटण्यासाठी हट्ट करू लागली तेव्हा त्याची पोलखोल झाली. वडील समजावून सांगण्याचा प्रयत्न करत होते, पण मुलगी आईला भेटण्यासाठी ओरडत रडू लागली. आरडा ओरडा ऐकून शेजारचे लोक जमा झाले. मुलीने जेव्हा वडील आईला भेटू देत नसल्याचे सांगितले तेव्हा लोकांना शंका आली. लोक बळजबरी घरात घुसले. पण दरवाजा उघडातच सगळ्यांना धक्का बसला. खोलीत ललिताचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात पडला होता. लोकांनी पोलिसांना माहिती दिली आणि पोलिस पोहोचताच आरोपीला अटक झाली
मुलीला बसला धक्का, म्हणाली-वडील आईला नेहमी मारायचे
आईच्या मृत्यूनंतर मुलीला जबर धक्का बसला आहे. तिची रडून रडून वाईट अवस्था झाली आहे. तिने पोलिसांना सांगितले की, आई वडिलांमध्ये सारखे भांडण व्हायचे. आईला वडिलांचे दारु पिणे पसंत नव्हते. विरोध केला तर ते आईला मारायचे. त्यामुळे आई नेहमी माहेरी जायची. मृत महिलेचे माहेर बिहारच्या औरंगाबादचे आहे.
मुलीला सांगितले हॉस्पिटलमध्ये आहे आई
पोलिसांनी सांगितले की, तीन दिवसांपूर्वी दोघांमध्ये भांडण झाले तेव्हाच त्याने लोखंडी रॉडने पत्नीवर हल्ला केला असावा. घटनेनंतर त्याने मुलीला ललिताचा मृतदेह असलेल्या खोलीत जाऊ दिले नाही. मुलीने विचारल्यावर तो आईची तब्येत बरी नसून ती हॉस्पिटलमध्ये आहे असे सांगायचा.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.