आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करातायपेई - तैवानच्या एका स्थानिक बॉक्सरने आपल्या गर्लफ्रेंडचा निर्घृण खून करून गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. 28 वर्षीय गॅरी चू आणि 27 वर्षीय तरुणी ह्वांग (अडनाव) या दोघांची भेट काही महिन्यांपूर्वी टिन्डर या ऑनलाइन डेटिंग अॅपने झाली होती. पोलिसांना तरुणीच्या शरीराचे तुकडे 7 वेग-वेगळ्या पॉलिथिन बॅगमध्ये गार्डनमध्ये गाडलेल्या अवस्थेत सापडले आहेत. हे कृत्य करण्यापूर्वी गॅरीने एक फेसबूक पोस्ट सुद्धा लिहिली होती. त्यातून पोलिसांना प्रकरणाचा तपशील मिळाला.
भावाने आधीच केले होते बहिण ह्वांगला सतर्क...
- तैवानच्या स्थानिक माध्यमांच्या वृत्तानुसार, तरुणीचा भाऊ (ह्वांग)ला आपली बहिण आणि स्थानिक बॉक्सर गॅरी चू यांच्यातील अफेअरची माहिती मिळाली होती. त्याने याच मे महिन्यातच आपल्या बहिणीला गॅरीपासून दूर राहण्याचा इशारा दिला होता.
- या घटनेच्या 2 दिवसांपूर्वी 18 मे रोजी सुद्धा त्याची बहिण घराबाहेर पडली होती. तेव्हा ह्वांगने तिला मेसेज करून गॅरीला भेटू नकोस असे सांगितले होते. पण, त्या तरुणीने मेसेजचा एकही रिप्लाय दिला नाही. 19 मे रोजी संध्याकाळी तिचा फोन बंद झाला.
- दुसऱ्या तिसऱ्या आणि सलग 6 व्या दिवशी भाऊ ह्वांगने तिला फोन करण्याचा प्रयत्न केला. अखेर संपर्क न झाल्याने त्याने 26 मे रोजी आपली बहिण बेपत्ता असल्याची फेसबूक पोस्ट लिहिली. आपल्या बहिणीला कदाचित गॅरीने बळजबरी डांबले असावे असा संशय त्याला आला होता. परंतु जे घडले त्याची ह्वांगने कधी कल्पनाही केली नव्हती.
का विरोध होता तरुणीच्या भावाचा?
गॅरी चू याने आपल्या पहिल्या पत्नीचा खूप मानसिक आणि शारीरिक छळ केला होता. त्याच्या विरोधात पोलिसांत तक्रार सुद्धा दाखल करण्यात आली होती. सोबतच अमली पदार्थांच्या तस्करी आणि सेवन प्रकरणी तो तुरुंगात सुद्धा गेला होता. त्यामुळेच ह्वांग आपल्या बहिणीला वारंवार फोन करून गॅरीपासून दूर राहण्यास सांगत होता.
गॅरीने फेसबूकवर लिहिले...
- गॅरीने पीडित तरुणीच्या भावाची फेसबूक पोस्ट पाहिल्यानंतर त्याच दिवशी संध्याकाळी एक फेसबूक पोस्ट लिहिली. त्यामध्ये त्याने पोलिसांना हत्येचा सुगावा दिला.
- त्याने लिहिले, माझी आणि ह्वांगची भेट डेटिंग अॅपच्या माध्यमातून झाली होती. भेट झाल्यानंतर मी तिला खूप सांभाळून घेतले. ती जेव्हाही बाहेर जायची तेव्हा, घरी तिच्या पालकांनी ती माझ्यासोबत आहे असे म्हटले होते. प्रत्यक्षात ती माझ्यासोबत नसायची.
- तिने रिलेशनशिपच्या सुरुवातीला मी एक व्हर्जिन आहे असे सांगितले होते. प्रत्यक्षात ती व्हर्जिन नव्हती. मी तिला कधीच माफ करणार नाही. कधीच तिला बोलणार नाही. तिने माझे मन दुखावले.
- यापुढे गॅरीने लिहिले, ती वारंवार दुसऱ्यांसोबत संबंध ठेवायची. माझ्यासोबत असतानाही ती दुसऱ्या तरुणांसोबत चॅटिंग करताना पकडली गेली होती. त्याने चॅटिंगचे स्क्रीनशॉट देखील सोशल मीडियावर पोस्ट केले.
- तिला मी वारंवार माफ केले कारण मी मवाळ होतो. तिच्यासोबत सौम्य वागलो. कित्येकवेळा तिला सोडूनही दिले होते. ती परत माझ्याकडे येऊन विनवणी करायची. माफीची भीक मागायची. मी तुझ्यासाठी बदलणार असे म्हणायची. पण, ती कधीच बदलली नाही. आता मात्र, मी सौम्यपणे वागणार नाही. तिने मला दगा दिला.
पोलिस घटनास्थळी पोहोचले तेव्हा...
- गॅरीची फेसबूक पोस्ट पाहताच तरुणीच्या भावाने पोलिसांना फोन लावला. त्यानुसार पोलिस न्यू तायपेई शहरात असलेल्या गॅरीच्या घरी पोहोचले. पोलिसांना घरात काहीच सापडले नाही. यानंतर सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात आला. त्यामध्ये 22 मे च्या रात्री 1 वाज गॅरी चू आपल्या गार्डनमध्ये संशयास्पद बॅगा घेऊन जात असताना दिसून आला.
- एकानंतर एक 7 बॅग त्याने आपल्या घरातील बगीचात पुरले होते. त्याच ठिकाणी शोध घेतला असता 7 कॅरीबॅगमध्ये तरुणीच्या मृतदेहाचे तुकडे सापडले.
- यानंतर 28 मे रोजी पोलिसांना घरापासून काही अंतरावर एका झाडाला गॅरी चू याचा मृतदेह लटकलेल्या अवस्थेत सापडला. त्याने गळफास घेऊन आत्महत्या केली होती.
- पोलिसांनी या घटनेनंतर गॅरीच्या माजी पत्नीची चौकशी केली. तेव्हा तिने सुद्धा आपला माजी पती गॅरी तिचा मानसिक आणि शारीरिक छळ करत असल्याचे म्हटले. तसेच ह्वांगच्या भावाने पोलिसांना जे काही सांगितले त्यात तथ्य असल्याचा दुजोरा दिला.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.