आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Restaurant मध्ये ऑर्डर केली फक्त पाण्याची बॉटल, अन् टिपमध्ये दिले तब्बल $10,000

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

ग्रीनविले - अमेरिकेतील नॉर्थ कॅरोलीना प्रांतात सप डॉग्स नावाच्या एका रेस्त्रॉमध्ये एका महिला वेटरचे भाग्य उजळले आहे. तिला एका टिपमध्ये जे मिळाले त्याची तिने स्वप्नातही कल्पना केली नव्हती. अलैना कस्टर असे तिचे नाव असून ती रोजप्रमाणेच कस्टमर्सकडून ऑर्डर घेत होती. त्यात एका कस्टमरने तिला फक्त पाणी ऑर्डर केले. फक्त दोन बॉटल पाणी ऑर्डर करून त्याने दुसरे काहीच मागवले नाही. यानंतर कस्टरने त्याला बिल दिले. त्या ग्राहकाने पाण्याच्या बिल देण्यासाठी 100 डॉलरच्या नोटांचा एक बंडल काढला. नोटा मोजल्या आणि पाण्याचे बिल त्यामध्ये ठेवले. यानंतर तो अख्खा बंडल त्याने वेटरला टिप म्हणून दिला. ते एकूणच 10 हजार अमेरिकन डॉलर अर्थात 7.37 लाख रुपये होते. 


कोण होता तो?
10 हजार अमेरिकन डॉलरची टिप देताना त्याने अलैना कस्टरला स्वादिष्ट पाणी दिल्याबद्दल खूप-खूप धन्यवाद असे सांगितले. सुरुवातीला त्या 100-100 डॉलरच्या नोटा खऱ्या आहेत का यावरच अलैनाला विश्वास बसत नव्हता. तिने वेळीच विचारले की हे काय आहे? हा काही जोक तर नाही ना? त्यावर त्याने फक्त धन्यवाद असे उत्तर दिले. लाखो रुपयांची टिप देणारा हा माणूस प्रत्यक्षात एक युट्यूब स्टार असून Mr Beast या नावाने प्रसिद्ध आहे. युट्यूबवर त्याचे 89 लाख फॉलोअर्स आहेत. त्या हॉटेलमध्ये तो आपल्या एका मित्रासोबत आला होता. त्यांनी टिप दिल्यानंतर वेटरची रिअॅक्शन कॅमेऱ्यात कैद केली. कॅमेऱ्यात तिच्या रिअॅक्शनचा व्हिडिओ शूट करतानाच तो बाहेर निघून गेला. 


आणखी परतला तेव्हा...
अलैनाने सांगितल्याप्रमाणे, तो टिप देताना आणि टिप दिल्यानंतर सुद्धा तिच्या चेहऱ्यावरचे भाव आणि प्रतिक्रिया कॅमेऱ्यात शूट करत होता. अगदी रेस्त्रॉमधून बाहेर पडला तोपर्यंत त्याचा कॅमेरा सुरूच होता. यानंतर तो अचानक पुन्हा रेस्त्रॉमध्ये परतला. यावेळी त्याचा कॅमेरा बंद होता. त्याने परत येऊन तेथे थांबलेल्या सर्वच वेटर्सला मिठी दिली आणि धन्यवाद म्हणून निघून गेला. 


एकटी घेणार नाही, सर्वांना शेअर करणार टिप
अलैनाने सांगितल्याप्रमाणे, ही टिप तिच्यासाठी खरोखर एक आशीर्वाद आहे. सप डॉग्स रेस्त्रॉ असो की अमेरिकेतील कुठलेही रेस्त्रॉ किंवा फास्ट फूड स्टॉल यात आमच्यासारखे कॉलेज सोडलेले विद्यार्थीच काम करतात. खर्च पुरत नसल्याने अशा ठिकाणी कामे करावी लागतात. "या रेस्त्रॉमध्ये मी एकटी काम करत नाही. त्यामुळे, मिळेलेली टिप आम्ही सर्वांमध्ये शेअर करणार आहोत." असे तिने म्हटले आहे.

बातम्या आणखी आहेत...