आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • International
  • Man Left Alone By Childrens After Wifes Death, People Heard Noise Of Crying From His House & Called Police

पत्नीच्या मृत्यूनंतर वृद्धाला घरात एकटे सोडून गेले मुले, सामानही नव्हते.. पोलिसांनी केले असे काही की सगळे करताहेत कौतुक

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बर्मिंघम - बर्मिंघमच्या लेडीवूड परिसरात राहणाऱ्या काही लोकांना नेहमी शेजारच्या घरातून रडण्याचा आवाज यायचा. अनेक दिवस रोज हा आवाज ऐकणूण लोक जवळच्या पोलिस स्टेशनमध्ये काम करायचे. त्यानंतर दोन पोलिस आले आणि त्यांनी घराचे दार वाजवले. घर संपूर्ण रिकामे होते. फक्त एक सोफा होता आणि त्यावर एक वृद्ध अत्यंत उदासपणे बसलेला होता. अधिकाऱ्यांना वाटले त्याच्या घरात चोरी झाली. पण त्यानंतर वृद्धाने जे सांगितले त्याने सर्वांनाच धक्का बसला. 


भावूक वृद्ध म्हणाला, काही दिवसांपूर्वीच त्याच्या पत्नीचा मृत्यू झाला. नंतर त्याची मुले त्याला नातेवाईकाकडे एकटे सोडून गेले. जाताना ते घरातले संपूर्ण सामानही घेऊन गेले. अनेक दिवसांत तो जेवला नसल्याचेही पोलिसांनी सांगितले. पोलिसांना हे ऐकूण प्रचंड दुःख झाले. ते वृद्धाला कुटुंबाचा शोध घेतो सांगून गेले आणि काही वेळातच परत आले. त्यानंतर जे झाले ते पाहून वृद्धाला रडू आले. त्या दोन पोलिसांनी त्याच्यासाठी एक नवा टीव्ही, टोस्टर, केटली आणि गरजेचे सामान आणले होते. महिला पोलिस डबल्यू रॉजर्सने त्याला सर्वात आधी चहा आणि टोस्ट तयार करून दिले. तर दुसरा पोलिस अधिकारी पीसी ग्रीव्सने टीव्ही घरात लावून आवडीचे चॅनल सुरू करून दिले. 


असे लोक जगात कमी 
दोघे पोलिस त्या वृद्धाजवळ बसले. त्यांनी त्याला आपण जवळच राहतो असे सांगितले. रॉजर्सने वृद्धाचा हात हातात घेत त्याला आपलेपणाची जाणीव करून दिली. भावूक होऊन तो म्हणाला की, असे लोक जगात फार कमी असतात. 


पोलिसांचे कौतुक 
पोलिस सध्या या वृद्धाच्या कुटुंबाचा शोध घेत आहेत. तसेच या दोन पोलिस अधिकाऱ्यांचे त्यांनी केलेल्या चांगल्या कामासाठी कौतुकही होत आहे. 

बातम्या आणखी आहेत...