Home | Khabrein Jara Hat Ke | Man loses his 120 kg weight by eating chocolate every night

व्यक्तीचे वजन वाढून झाले 200 किलो, उठ बस करायलाही व्हायचा प्रचंड त्रास, मग रोज रात्री खायला सुरू केली एक खास गोष्ट

दिव्य मराठी वेब टीम | Update - Jan 09, 2019, 12:00 AM IST

काही महिन्यांतच कमी झाले 120 kg वजन. कंबर 60 इंचाची 34 इंचावर आली.

 • Man loses his 120 kg weight by eating chocolate every night

  चेशायर - इंग्लंडमध्ये राहणाऱ्या एका व्यक्तीने विचित्र दावा करत अत्यंत वेगाने वजन कमी करण्याचे श्रेय एका खास चॉकलेटला दिले आहे. त्याचे वजन 200 किलोपर्यंत पोहोचले होते. त्यामुळे त्याला चालण्या फिरण्याबरोबर उठ-बस करायलाही त्रास होत होता. पण त्याने चॉकलेट खायला सुरुवात केली आणि त्याचे वजन एवढे चमत्कारिक रित्या कमी झाले की थेट 82 किलोवर आले. त्याचे मित्र, कुटुंबीयही हा चमत्कार असल्याचेच म्हणत आहेत.

 • Man loses his 120 kg weight by eating chocolate every night

  चॉकलेट खाल्ल्यानेही कमी होते वजन 
  - ही स्टोरी 39 वर्षांच्या मॅथ्यू ह्यूजेसची आहे. तो त्याची पत्नी कॅरी मर्फी (37) बरोबर इंग्लंडच्या विडनेस शहरात राहतो. मॅथ्यू काही दिवसांपूर्वीपर्यंत वाढलेल्या वजनामुळे त्रस्त होता. पण आता त्याचे वजन अगदी कमी झाले आहे. त्याचे क्रेडिट तो किटकॅट चॉकलेटला देत आहे. 
  - मॅथ्यूचे म्हणणे आहे की, गेल्या वर्षी त्याने रोज झोपण्यापूर्वी दोन बाइट किटकॅट टॉकलेट खायला सुरुवात केली होती. काही दिवसांतच त्याचा चांगला फायदा व्हायला लागला. आता तर त्याचे वजन 80 किलोपर्यंत कमी झाले आहे. 

 • Man loses his 120 kg weight by eating chocolate every night

  60 इंचाची होती कंबर 
  - मॅथ्यूच्या मते तो लहानपणापासूनच फार जाड होता. पण काही काळापूर्वी त्याचे वजन 200 किलोपर्यंत वाढले होते. त्यादरम्यान त्याची कंबर 60 इंचाची झाली होती. त्याच्या मापाचे कपडेही दुकानावर मिळत नव्हते. 
  - जाड असल्याचे लोक त्याची खिल्ली उडवायचे. त्याला या सर्वाचा प्रचंड त्रास व्हायचा. थोडा जरी चालला किंवा धावला तर त्याला धाप लागायची. 
  - वजन कमी करण्यासाठी त्याने डाएटवर तर लक्ष केंद्रीत केलेच पण रेग्युलर कार्डियो आणि वेटलिफ्टींगही केले. गेल्या आठ महिन्यांपासून तो हे सर्व करत आहे. आता तो एवढा बदलला आहे की, लोक त्याला ओळखूही शकत नाहीत. 

Trending