आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Man Married With Cobra Because To Get His Dead Girlfriend Alive

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

5 वर्षांपुर्वी मृत्यू झालेल्या गर्लफ्रेंडला परत मिळवण्यासाठी तरुणाने केले नागिनसोबत लग्न, गोष्ट ऐकून तुम्ही व्हाल चकीत

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जगभरात असे अनेक लोक आहेत, ज्यांचे त्याच्या पाळीव प्राण्यांवर प्रेम असते. ते त्यांच्यासोबत जेवतात, राहतात, फिरतात. पण येथे एका तरुणाने एका नागिनसोबत लग्न केले आहे. चकीत करणारी गोष्ट म्हणजे, त्याने प्रेमासाठी हे पाऊल उचलले आहे. 5 वर्षांपुर्वी मृत्यू झालेल्या प्रेमिकेला मिळवण्यासाठी त्याने हे पाऊल उचलले. 

 

ही बातमी खुप भयावह आहे. कारण या तरुणाने एका खतरनाक 10 फूट लांब कोबरा नागिनसोबत लग्न केले. तसेच हे दोघं एकाच घरात राहतात. दोघं एकाच वेळी जेवतात. मानवी दाम्पत्याप्रमाणे हे एकत्र बसून टीव्ही बघतात आणि सोबतच झोपतात. या दोघांमध्ये एवढे प्रेम आहे की, ही 10 फूट लांब नागिन आणि हा मुलगा एक क्षणही वेगळे होत नाही. 

 

या कोबरासोबत लग्न करण्याचे कारण यापेक्षा जास्त विचित्र आहे. या तरुणाच्या गर्लफ्रेंडचा मृत्यू 5 वर्षांपुर्वी झाला होता. पण हा तरुण तिच्यावर एवढे प्रेम करायचा की, 5 वर्षांचा काळ गेल्यानंतरही तो तिला विसरु शकला नाही. त्याला जाणिव झाली की, त्याचे प्रेम, म्हणजेच त्याची प्रेमिका नागिनच्या रुपात जन्म घेऊन त्याच्या आयुष्यात परत आली आहे. तेव्हा त्याने या कोबरासोबत लग्न केले. 

 

आता हे दोघं पती-पत्नी एकत्र पिकनिकला जातात. एकाच घरात टीव्ही पाहतात आणि नेहमी सोबतच राहतात. या अद्भुत घटनेमुळे जगातील लोक हैराण आहेत. हा तरुण बौध्द सिध्दांत मानतो, ज्यानुसार मानण्यात येते की, मृत्यूनंतर लोक प्राण्यांच्या रुपात पुनर्जन्म घेतात. याच कारणामुळे कोबरामध्ये तरुणाला आपली मेलेली प्रेमिका दिसली आणि आता त्याने तिच्यासोबत लग्न करुन एकत्र राहण्याचा निर्णय घेतला.