आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Transgender Marriage Viral Video: इंदूरमध्ये पार पडला \'एक विवाह ऐसा भी\', नवदाम्पत्य लवकरच दत्तक घेणार मुलगी

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

इंदूर- व्हॅलेंटाईन डेला अर्थात 14 फेब्रुवारीला इंदूरमध्ये कक अनोखा विवाह समारंभ पार पडला. एक तरुण आणि तृतियपंथी लग्नाच्या बेडीत अडकले. मागील एक वर्षापासून दोघे रिलेशनशिपमध्ये राहत होते.

 

मुलगा जुनैद हा इंदूरपासून जवळच असलेल्या राऊ येथील राहणारा आहे. तो एका मार्केटिंग कंपनीत नोकरी करतो. जुनैदने सांगितले की, त्याच्या नातेवाईकांचा या विवाहाला तीव्र विरोध होता. तरी देखील त्याचा न‍िर्धार पक्का होता. त्याने मित्र, समाजसेवकांच्या उपस्थितीत विवाह केला. इंदूर येथील बिजासन देवी मंदिर परिसरात हिंदू परंपरेप्रमाणे हा विवाह पार पडला.

 

जया सध्या एका एनजीओची सदस्य आहे. तृतियपंथींना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी ती कार्य करत आहे. विवाहनंतर जया आणि जुनैदने एक मुलगी दत्तक घेण्याचा निर्णय घेतला आहे. जया-जुनैदच्या विवाहाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

बातम्या आणखी आहेत...