आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

13 वर्षीय मुलीचे अबॉर्शन करण्यासाठी खासगी रुग्णालयात पोहोचले पालक, परंतु डॉक्टरांनी दिला नकार, पाठवले सरकारी रुग्णालयात तेव्हा समोर आले 'हे' सत्य

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

कोइंबतूर - तामिळनाडूत पोर्न व्हिडिओ पाहण्याच्या व्यसनामुळे एका 20 वर्षीय तरुणाने आपल्या छोट्या बहिणीवर वारंवार बलात्कार केला. अल्पवयीन मुलगी सध्या आठ महिन्यांची प्रेग्नंट आहे. पीडित मुलीचे आईवडील तिला गर्भपातासाठी रुग्णालयात घेऊन गेले, तेथे स्टाफने पोलिसांना माहिती कळवली, तेव्हा या प्रकरणाचा वाचा फुटली. मुलगा इंजिनिअरिंगचा विद्यार्थी आहे. ही घटना उजेडात आल्यावर तो बेपत्ता झाला आहे. त्याच्या शोधासाठी दोन विशेष पथके स्थापन करण्यात आली आहेत.

 

13 वर्षीय बहिणीवर केला बलात्कार...
- ही घटना कोइंबतूरमधील आहे. एका पोलिस अधिकाऱ्याने सांगितले की, आरोपी तरुण मोबाइलवर स्वत: पोर्न व्हिडिओ पाहायचाच, सोबत आपल्या 13 वर्षीय बहिणीलाही दाखवायचा.
- हे व्हिडिओ पाहून त्याने आपल्या बहिणीवर एकदा नाही, तर अनेकदा रेप केला. यामुळे ती प्रेग्नंट झाली.
- पालकांना जेव्हा हा प्रकार कळला तेव्हा त्यांनी मुलीला एका खासगी रुग्णालयात अबॉर्शनसाठी नेले, परंतु डॉक्टरांनी त्यांना नकार दिला.
- येथून पालकांना कोइंबतूर मेडिकल कॉलेजच्या सरकारी रुग्णालयात जाण्याचा सल्ला देण्यात आला. येथील डॉक्टरांनी कुटुंबीयांना सांगितले की, तुमची मुलगी आता 8 महिन्यांची प्रेग्नंट झालेली आहे. यासोबतच त्यांनी पोलिसांनाही कळवले.

 

पालक काहीही बोलायला तयार नाहीत...
- चाइल्ड प्रोटेक्शन अधिकारी ए. रिक्सन हे सोमवारी रुग्णालयात पोहोचले. येथे त्यांनी मुलगी आणि तिच्या पालकांची चौकशी केली, परंतु त्यांनी कोणत्याही प्रश्नाचे उत्तर देण्यास नकार दिला. 
- जेव्हा पालकांना पोलिस स्टेशनला नेण्यात आले तेव्हाही ते आपल्या मुलाविरुद्ध एफआयआर दाखल करण्यास तयार नाही झाले. परंतु पोलिसांनी आरोपी मुलाविरुद्ध पॉस्को अॅक्टअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. 
- तथापि, या प्रकरणाची तक्रार पोलिसांपर्यंत पोहोचल्यानंतर मुलगा घरातून बेपत्ता आहे. तो एका नातेवाइकाच्या घरी लपून राहत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. 
- पोलिस पथकाने जेव्हा तेथे धाड टाकली तेव्हा तो आढळला नाही. दुसरीकडे नातेवाईक म्हणाले की, आरोपी आत्महत्या करण्याची धमकी देत आहे.

 

 

बातम्या आणखी आहेत...