आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

धावत्या बसमध्ये तरुणीने एकटक पाहणाऱ्याला केला विरोध, तर प्रायव्हेट पार्ट दाखवू लागला तरुण, यानंतर मुलीने दाखवली अशी हिंमत

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - साऊथ दिल्लीच्या महरौली एरियात धावत्या बसमध्ये एक लाजिरवाणी घटना उघडकीस आली आहे. सीटवर बसलेल्या एका तरुणीने एकटक पाहण्यास विरोध केला म्हणून बसमध्ये प्रवास करणाऱ्या एका माथेफिरूने प्रायव्हेट पार्ट दाखवून अश्लील कृत्य केले. तथापि, तरुणीने हिंमत करून त्याला बसमध्ये बेदम चोप द्यायला सुरुवात केली. यानंतर 100 नंबरवर फोन केला. आरोपी मुकेश रंजनला पोलिसांनी अटक केली आहे.

 

घटनेदरम्यान बसमधील इतर प्रवासी फक्त तमाशा पाहत होते...
विवाहित आरोपी मुकेश हा रंगपुरी येथील एका इव्हेंट मॅनेजमेंट कंपनीत जॉब करतो. या पूर्ण घटनेदरम्यान बसमध्ये बसलेले प्रवासी तमाशा पाहत होते. ड्रायव्हर आणि कंडक्टरनेही पीडितेची साथ दिली नाही. बसमध्ये प्रवास करणाऱ्यांनी म्हटले की, याला चोप दिला आहे, सोडून द्या. परंतु पोलिसांना कॉल गेल्यामुळे बस रोखावी लागली. एका प्रवाशाने आरोपीला पकडून ठेवले होते.

 

तरुणीने सँडल काढून केली धुलाई, आरोपी दीदी-दीदी म्हणत मागू लागला माफी
संगम विहार एरियातील 26 वर्षीय तरुणी कुटुंबासोबत राहते. ती एका मीडिया संस्थेत जॉब करते. मंगळवारी रात्री ती बस क्रमांक- 717 (कापसहेड़ा रूट) वरून रात्री 9.15 वाजता आपल्या घरी जात होती. बस जवळजवळ पूर्णपणे भरलेली होती. माता चौक महिपालपूरवरून एक व्यक्ती बसमध्ये चढली. तो तरुणीच्या सीटच्या जवळ जाऊन उभा राहिला. काही वेळातच तो वाईट नजरेने तरुणीकडे एकटक पाहू लागला. आधी तर तरुणीने दुर्लक्ष केले, परंतु जेव्हा या माथेफिरूने प्रायव्हेट पार्ट दाखवला तेव्हा तरुणीने सँडल काढून त्याची धुलाई सुरू केली. चोप दिल्यानंतर आरोपीने तरुणीला दीदी-दीदी म्हणत सर्वांसमोर माफी मागितली. तरुणीने तिचा मोबाइल स्विच ऑफ असल्याने दुसऱ्या प्रवाशाला 100 नंबरवर फोन केला. आरोपीने पळून जाण्याचा प्रयत्न केला, परंतु तरुणीने त्याला पकडले. थोड्याच वेळात पोलिस आले आणि त्यांनी आरोपीला ताब्यात घेतले.


पूर्वीही घडल्या आहेत अशा घटना
याच प्रकारची एक घटना 7 फेब्रुवारी रोजी वसंत विहार एरियात झाली होती. रामलाल आनंद कॉलेजची विद्यार्थिनी दिवसा वसंत गावातून आपल्या मालवीय नगरातील घरी जात होती. तेथे बसमध्ये एका वयस्कर व्यक्तीने दिल्ली युनिव्हर्सिटीच्या एका विद्यार्थिनीला प्रायव्हेट पार्ट दाखवून घाणेरडे कृत्य केले. मुलीने या माथेफिरूचे कृत्य उजागर करण्यासाठी लपून त्याचा व्हिडिओ शूट केला आणि मग तिने आपल्या सोशल मीडियावरून तो व्हायरल केला. तथापि, या केसमधील आरोपीला अद्याप पकडता आलेले नाही.


ज्या प्रवाशाच्या मोबाइलवरून कॉल केला, त्याने जबाब दिला नाही
तरुणी म्हणाली की, घटनेनंतर बसमध्ये स्वार ज्या प्रवाशाच्या मोबाइलवरून मी पोलिसांना फोन केला, त्याने पोलिसांसमोर जबाब देण्यास नकार दिला. यानंतर पोलिसांनी पीडितेच्या तक्रारीवरून आरोपीविरुद्ध भादंवि कलम 354 व 509 अंतर्गत गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे. 

 

बातम्या आणखी आहेत...