आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अनैतिक संबंधानंतर लग्नासाठी तगादा लावल्याने महिलेचा गळा आवळून खून

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

भोकरदन/सोयगाव देवी  - पत्नी मृत झाल्यानंतर दुसऱ्या महिलेशी ओळख करून अनैतिक संबंध ठेवले. यानंतर तिने लग्न कर असा तगादा लावला. यामुळे तिला शेतात बोलावून साडीने गळा आवळून तिचा खून केला. पंचफुला धनाजी करताडे (४३, सिल्लोड) असे मृत महिलेचे नाव असून सदाशिव कृष्णा घारे (५०) असे आरोपीचे नाव आहे. मृतदेह ४ दिवसांपूर्वी आव्हाना येथील घारेवाडी शिवारात आढळून आला हाेता. भोकरदन तालुक्यातील आव्हाना येथील घारेवाडी शिवारात रामदास बजेबा गावंडेंच्या कपाशीच्या शेतात १४ नोव्हेंबर रोजी पंचफुला करताडे या महिलेचा कुजलेला मृतदेह आढळून आला होता. या प्रकरणात मुलाच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल झाला होता.  पोलिसांनी तपास केला असता सदाशिव घारेनेच खून केला असल्याचे तपासात निष्पन्न झाले. अधिक विचारपूस केली असता आरोपीने त्याच्या पत्नीचे निधनानंतर मृत पंचफुला करताडंेशी  ओळख करून तिच्याशी अनैतिक संबंध स्थापित केले होते. १० नोव्हेंबर रोजी त्याने महिलेला फोन करून शेतात बोलावून घेतले.  महिलेने माझ्याशी लग्न कर, असा तगादा लावल्यामुळे त्याने तिचा तिच्याच साडीने गळा आवळून खून केला होता.  तपास  डीवायएसपी सुनील जायभाये, पोलिस निरीक्षक दशरथ चौधरी, त्यांचे सहकारी बी. बी. वडदे,  सायस नागरगोजे, रुस्तुम जेवाळ, जगन्नाथ जाधव, अभिजित वायकोस, समाधान जगताप यांनी केला. बातम्या आणखी आहेत...