आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तमिळनाडू : पत्नीने शरीरसंबंधांस नकार दिला तर रागात येत त्याने धडापासून वेगळे केले शीर, शरीरसंबंधांबाबात काय सांगतो कायदा

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

चेन्नई - तमिळनाडूच्या त्रिचीमध्ये पत्नीने शरीरसंबंधासाठी नकार दिल्याने पतीने रागाच्या भरात तिची हत्या केल्याचे समोर आले आहे. पोलिसांच्या मते, 34 वर्षांच्या या व्यक्तीने पत्नीचे शीर धडापासून वेगळे केले. आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे. या दोघांचा विवाह काही महिन्यांपूर्वीच झाला होता असे समोर येत आहे. 


काय म्हणतात तज्ज्ञ
सिनियर अॅडव्होकेट संजय मेहरा यांनी सांगितले की, लग्नानंतर कोणत्याही पुरुषाने शरीरसंबंधांसाठी पत्नीवर बळजबरी करणे बेकायदेशीर आहे. संबंध दोघांच्या सहमतीनेच ठेवले जाऊ शकतात. पण लग्नानंतर पत्नी संबंध ठेवण्यास तयार नसेल तर ते घटस्फोटाचे कारण ठरू शकते. हिंदु विवाह कायद्यानुसार पती या मुद्द्यावर घटस्फोटासाठी अर्ज करू शकतो. कोर्ट या आधारावर घटस्फोट मंजूर करते. 


हिंदू विवाह कायद्याच्या कलम 13 अंतर्गत अशा प्रकरणांमध्ये घटस्फोट घेता येऊ शकतो. गुजरात हायकोर्टाने एका प्रकरणात स्पष्ट केले आहे की, पत्नीवर शरीर संबंधांसाठी बळजबरी करणे हा आईपीसीच्या कलम 354 अंतर्गत गुन्हा ठरू शकतो. त्यामुळे हा प्रकार महिलेच्या प्रतिष्ठेला धक्का लागणारा ठरतो. 


पत्नी करू शकत नाही बलात्काराची तक्रार.. 
गुजरात हायकोर्टाने एका निर्णयात म्हटले होते की, पतीने पत्नीच्या मर्जीविरोधात शरीरसंबंध ठेवले असले तरी पत्नी बलात्काराचा गगुन्हा दाखल करू शकत नाही. पण पत्नी अनैसर्गिक सेक्ससाठी आयपीसीच्या कलम 377 अंतर्गत गुन्हा दाखल करू शकते. 

 

 

बातम्या आणखी आहेत...